Tu Jhoothi Main Makkaar movie Shot Without Script Instagram
मनोरंजन

Ranbir Kapoor: स्क्रिप्टशिवाय शूट केलाय 'तू झूठी,मै मक्कार' सिनेमा.. कसं जमलं सगळं..काय म्हणाला रणबीर..

'तू झूठी,मै मक्कार' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत रणबीरनं सिनेमा स्क्रिप्टशिवाय शूट केल्यासंदर्भात दावा करत काही खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

Ranbir Kapoor: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलताच बिझी आहे. अभिनेत्यानं प्रमोशन निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत दावा केला आहे की त्यांनी स्क्रिप्टशिवायच 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाचं शूटिंग केलं आहे.

अभिनेत्यानं हे देखील सांगितलं आहे की, 'ब्रह्मास्त्र 2', 'एनिमल' व्यतिरिक्त त्याच्याकडे सध्या कोणताही सिनेमा नाही. (Tu Jhoothi Main Makkaar movie Shot Without Script)

मीडियाशी केलेल्या संवादा दरम्यान रणबीर कपूर म्हणाला-''जेव्हा तुम्ही रोमकॉम जॉनरच्या सिनेमात काम करता तेव्हा तुम्हाला वाटतं की हे खूप सोपं असेल. पण या सिनेमाचा प्रत्येक सीन आणि गाणं करताना मला खूप मेहनत घ्यावी लागली होती. सिनेमाचं शूटिंग तसं पाहिलं तर १२० दिवसांत पूर्ण होतं. पण आम्ही हा सिनेमा १८० दिवसांत पूर्ण केला..ते सुद्धा स्क्रिप्टशिवाय..''

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर म्हणाला-''मी अद्याप कोणताही नवीन सिनेमा साइन केलेला नाही. पण आशा आहे येणाऱ्या दिवसांत मी एखादी नवी स्क्रिप्ट ऐकेन. मला कशाची घाई नाहीय सध्या. मला माझ्या मुलीसोबत वेळ घालवायचा आहे''.

''जर आणखी एक वर्ष देखील मला काम मिळालं नाहा तरी मी खूश राहीन. पण हो..सध्या माझ्याकडे 'ब्रह्मास्त्र २' आणि 'एनिमल' शिवाय दुसरा कोणताही सिनेमा नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT