ranbir kapoor and Shraddha kapoor Sakal
मनोरंजन

TJMM Box Office: 'तू झुठी में मक्कार'ची छप्परफाड कमाई, रणबीर कपूरचा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

सुपरस्टार रणबीर कपूरचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' आजकाल प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकार रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर या जोडीने 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. रिलीज होऊन जवळपास 3 आठवडे उलटल्यानंतरही 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटगृहांमध्ये धमाल करत आहे. त्यामुळे 'तू झुठी मैं मक्कार' बॉक्स ऑफिसवरही आपली मजबूत पकड कायम ठेवत आहे. दरम्यान, आता बातमी येत आहे की, दिग्दर्शक लव रंजनच्या चित्रपटाने जागतिक कमाईच्या बाबतीत द्विशतक ठोकले आहे.

बॉलीवूड चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. रिलीज होऊन 21 दिवस उलटले तरी 'तू झुठी मैं मक्कार' पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक थिएटरमध्ये येत आहेत. दरम्यान, मानव मंगलानी यांनी 'तू झुठी में मक्कार'च्या कलेक्शनबाबत लेटेस्ट माहिती दिली आहे.

मानवच्या म्हणण्यानुसार, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर 'तू झुठी मैं मक्कार' ने आतापर्यंत जगभरात 201 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच भारतीय बॉक्स ऑफिसवर 'तू झुठी में मक्कार'च्या कलेक्शनने 130 कोटींचा आकडा पार केला आहे आणि एकूण कमाई 161 कोटींच्या पुढे गेली आहे. अशा प्रकारे हे स्पष्टपणे म्हणता येईल की 'तू झुठी मैं मक्कार' सुपरहिट चित्रपट ठरला आहे.

मानव मंगलानी यांनी 'तू झुठी में मक्कार'च्या जगभरातील कलेक्शन तसेच परदेशातील व्यवसायाची माहिती दिली आहे. त्यामुळे रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी मैं मक्कार'ने परदेशात 40 कोटींची बंपर कमाई केली आहे. एकूणच 'तू झुठी मैं मक्कार'ला भारताबरोबरच परदेशातही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT