Abhishek Nigam replace sheezan khan in alibaba dastan e kabul after tunisha sharma death case Google
मनोरंजन

Tunisha Sharma च्या निधनानंतर निर्मात्यांचा मोठा निर्णय, मालिकेत शीझानला रीप्लेस करणार 'हा' अभिनेता...

अलीबाबा: दास्तां-ए-काबुल या मालिकेच्या सेटवर तुनिषा शर्मानं आत्महत्या केली अन् याप्रकरणात मालिकेचा अभिनेता शीझान खानला अटक केली आहे.

प्रणाली मोरे

Tunisha Sharma Death Case: 24 डिसेंबरला अभिनेत्री तुनिषा शर्मानं आपल्याच मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली अन् संबंध टी.व्ही इंडस्ट्री हादरली. तुनिषाच्या चाहत्यांनाही तिच्या मृत्युमुळे मोठा धक्का बसला आहे. तुनिषा शर्मा अलीबाबा: दास्तां-ए-काबुल मालिकेची मुख्य अभिनेत्री होती.

तुनिषाच्या आत्महत्येच्या केसमध्ये प्रमुख आरोपी म्हणून तिचा सहकलाकार शीझान खानला ताब्यात घेण्यात आलं आहे. वालीव पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.(Abhishek Nigam replace sheezan khan in alibaba dastan e kabul after tunisha sharma death case)

तुनिषाच्या आत्महत्येमुळे आता मालिकेला याचा मोठा फटका बसणार हे तर निश्चित आहे. आता बातमी समोर आली आहे की शीझानला लवकरच मालिकेतून रीप्लेस केलं जाणार आहे.

रिपोर्टनुसार बातमी आहे की,शीझान खानला अभिषेक निगम रीप्लेस करणार आहे. अभिषेक निगमनं तुनिषा शर्मा सोबत 'हीरो गायब मोड ऑन' मालिकेत काम केलं होतं. यासंदर्भात अद्याप अभिषेक निगम किंवा अलीबाबा: दास्तां-ए-काबुल च्या निर्मात्यांकडून कोणतंही कन्फर्मेशन मिळालेलं नाही.

माहितीसाठी इथं सांगतो की अलीबाबा: दास्तां-ए-काबुल ही मालिका बिग बजेट मालिका आहे. मोठ्या धूमधडाक्यात या मालिकेचं लॉन्चिंग करण्यात आलं होतं. हळूहळू लोक या मालिकेला पसंत करू लागले होते. मालिकेतील मु्ख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या तुनिषा शर्मा आणि शीझान खानच्या ऑनस्क्रीन जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली होती. पण जेव्हा तुनिषा शर्मानं आत्महत्या केली त्यानंतर आता मालिकेचा ट्रॅक अचानक बदलणं भाग पडलं आहे. त्यामुळे कदाचित याचा परिणाम टीआरपी वर होऊ शकतो. मालिकेत शीझान 'अलीबाबा' आणि तुनिषा 'शहजादी'ची व्यक्तिरेखा साकारत होती.

मालिकेत तुनिषाच्या जागी नवी अभिनेत्री येणार हे तर होणारच होतं पण आता शीझानलाही निर्माते रीप्लेस करणार असल्याच्या बातमीनं जोर धरलाय. यासोबत आणखी एक बातमी जोर धरुन आहे ती म्हणजे मालिकाच बंद होणार. निर्माते कदाचित शो चा पहिला भाग म्हणत मालिका इथेच थांबवू शकतात असं देखील बोललं जात आहे.

आणि ठराविक ब्रेकनंतर मालिकेचा दुसरा भाग आणू शकतात,ज्यात नवीन चेहरे पहायला मिळू शकतात. आता अभिनेता म्हणून अभिषेक निगमचं नाव समोर येत आहे पण अभिनेत्री म्हणून कोण तुनिषाची जागा घेणार हे कळालेलं नाही. मालिकेला पुन्हा नव्यानं लॉन्च केलं जाईल असं देखील कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT