Tunisha Sharma Was Pregnant, Boyfriend Refused To Marry Her sakal
मनोरंजन

Tunisha Sharma: तुनिषा शर्मा गरोदर होती का? बॉयफ्रेंड सोबतच्या संबंधांवर होतेय चर्चा..

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

नीलेश अडसूळ

tunisha sharma: सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे ती अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येची. 'सब' टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने सेटवरील रूममध्येच गळफास लावून आत्महत्या केली आणि एकच खळबळ माजली. अवघ्या 20 व्या वर्षी तिने स्वतःला संपवल्याने मनोरंजन विश्वासाठी हा मोठा धक्का होता. पण आता या प्रकरणाची कसून चौकशी होत आहे. याच चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

(Tunisha Sharma Was Pregnant, Boyfriend Refused To Marry Her)

सेटवर तिने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. आता तिने आत्महत्या का केली याची कारणे शोधली जात आहे. पोलिसही याचा कसून तपास करत आहेत. प्राथमिक तपासात तुनिषा प्रचंड नैराश्यात होती अशी माहिती समोर आली आहे. पण तिच्या स्ट्रेस मागचे कारण मात्र समोर आलेले नाही. आता ती गरोदर असल्याचेही बोलले जात आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा ही शिझान खान या तिच्या सहकलाकारासोबत रिलेशनमध्ये होती. काही दिवसांपूर्वी तिचे ब्रेकअपही झाले होते. त्यांच्या नात्यात बराच तणाव होता. तर तुनिषा तुनिषा ही गरोदर असून तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

याबाबत अजून डॉक्टरांनी अधिकृत अहवाल दिला नसला तरी आजच तिचे शवविच्छेदन होणार आहे. शिवाय पोलिसांचा कसून तपास सुरू असल्याने काय माहिती समोर येतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT