Tunisha Sharma News  esakal
मनोरंजन

Tunisha Sharma Case : ब्रेकअपनंतरही तुनिषा करायची मेसेज, पण शिझानने...; पोलिसांचा नवा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आपली सह-कलाकार तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूप्रकरणी कथित आरोप असलेला अभिनेता शिझान खानने पोलिस कोठडीदरम्यान आपल्या कथित दुसऱ्या मैत्रिणीसोबतचे व्हॉट्सअॅप चॅट डिलीट केले, असा दावा महाराष्ट्र पोलिसांनी केला आहे. शिझानच्या 5 दिवसांच्या रिमांडसाठी पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या अर्जात अधिकाऱ्यांनी असा दावा केला. (Tunisha Sharma Suicide Case news in Marathi )

शिझान खानचे तुनिशा शर्माशिवाय इतर एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्या मोबाइलमधील अनेक चॅट डिलीट केले होते. जप्त करण्यात आलेल्या काही चॅटनुसार, आरोपी इतर अनेक मुलींशीही बोलत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीच्या मोबाईलवर तपासादरम्यान अनेक महत्त्वाच्या चॅट आढळून आल्या आहेत, त्यात ब्रेकअपनंतर आरोपीनं तुनिषापासून स्वत:ला दूर करायला सुरुवात केल्याचं समोर आलं आहे.

तुनिषा आरोपी शिझानला वारंवार मेसेज करत असे, पण शिझानने त्याला प्रतिसाद दिला नाही. २४ डिसेंबर रोजी शिझानने या मालिकेच्या सेटवर तुनिषाला थप्पड लगावली होती, असे तुनिषाच्या आईने आपल्या रेकॉर्ड केलेल्या जबाबात म्हटले आहे. याशिवाय आरोपी तुनिषाला उर्दू शिकून हिजाब घालण्यास सांगत होता, मात्र याबाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाही, असा खुलासाही पोलिसांनी केला आहे.

अधिकाऱ्यांनी पुढे दावा केला की, सीसीटीव्ही फुटेजनुसार, तुनिषा आत्महत्या करण्यापूर्वी शिझानच्या मेकअप रूममध्ये गेली आणि थोड्या वेळाने बाहेर आली. मग असं दिसतं की शिझान सेटवर गेला आणि तुनिषा त्याच्या मागे लागली, पण सेटच्या गेटवर गेल्यानंतर ती पुन्हा आपल्या मेकअप रूममध्ये परतली. पोलिसांनी कोर्टाकडे पाच दिवसांची रिमांड मागितली, मात्र कोर्टाने आरोपी शिझानला 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT