मनोरंजन

शर्टलेस फोटो पोस्ट केल्याने तुषार कपूर ट्रोल

अभिनेत्री सेलिना जेटलीनेही केली तुषारच्या फोटोवर कमेंट

स्वाती वेमूल

अभिनेता तुषार कपूर Tusshar Kapoor सध्या त्याच्या काही फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तुषाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही शर्टलेस फोटो पोस्ट केले असून याच फोटोंमुळे तो चर्चेत आला आहे. तुषारच्या या फोटोंवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत असून काहींनी त्याला ट्रोलसुद्धा केलं आहे. तुषारच्या दिसण्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 'म्हातारा झाला आहेस', असं काहींनी कमेंटमध्ये लिहिलं. तर अभिनेत्री सेलिना जेटलीनेही तुषारची गंमत केली. 'हमदर्दचं टॉनिक सिंकारा हा चांगला पर्याय असू शकतो', अशी कमेंट करत सेलिनाने तुषारची मस्करी केली. तर काहींनी लिहिलं, 'रामू काका म्हातारा दिसतोय'.

तुषारने २००१ साली त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तुषारने 'क्या दिल ने कहा', 'ये दिल', 'जीना सिर्फ मेरे लिए', 'कुछ तो है' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र तुषारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

तुषारने रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल' चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. २००६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही त्याने तीच भूमिका साकारली. तुषार सध्या अभिनयापासून दूर असून निर्मिती क्षेत्रात काम करत आहे. २०१६ साली आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेत सरोगसीद्वारे तुषारने लक्ष्य या मुलाचा स्वीकार केला. तुषार हा लक्ष्यचा एकल पिता असून त्याच्या संगोपनाची जबाबदारी तो स्वत: पार पाडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT