Actor Tusshar Kapoor  Team esakal
मनोरंजन

'मी सिंगलच बरायं, काहीही झालं तरी लग्न नकोच'

तुषारनं त्याच्या पर्सनल लाईफविषयी एक मोठे विधान केले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्याला सलमान खान (salman khan) या अभिनेत्याविषयी माहिती आहे की त्याचे अद्याप लग्न (married) झालेले नाही. मात्र त्याच्याशिवाय आणखी एक अभिनेता आहे ज्याला लग्न करायचं नाहीये. तो ही बॉलीवूडमधला प्रसिध्द अभिनेता आहे. त्याचे वडिलही प्रख्यात अभिनेते होते. त्याच्या अशाप्रकारच्या विधानामुळे तो अभिनेता चर्चेत आला आहे. त्या अभिनेत्याचे नाव आहे तुषार कपूर. तुषार (tusshar kapoor) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा अभिनेता आहे. त्याचा फॉलोअर्सही मोठा आहे. (tusshar kapoor says he has no plans to get married and will not share himself with anybody now or in future)

तुषारनं त्याच्या पर्सनल लाईफविषयी एक मोठे विधान केले आहे. त्याला अनुसरुन तो जे बोलला आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. इ टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणतो की मला लग्नच करायचे नाहीये. मी सिंगलच खुश आहे. विशेष म्हणजे तो एक सिंगल फादरही आहे. त्यानं सेरोगसीच्या माध्यमातून एका मुलाचं पालकत्वही स्वीकारलं आहे. 44 वर्षांच्या तुषारनं जे मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या जात आहेत.

खरं सांगायचं तर मला लग्न करायचं नाही. मी सिंगल आहे (i am single i am happy) याचा मला आनंद आहे. लग्न करण्याचा कुठलाही प्लॅन नाहीये माझा. मला माझं आयुष्य आणखी कुणाबरोबर शेअर करायचे नाहीये. 2016 मध्ये तुषार हा लक्ष्य नावाच्या मुलाचा बाप झाला होता. त्यासाठी सेरोगसी तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. त्याची बहिण एकता कपूर ही देखील सिंगल मदर आहे. ती तिच्या मुलाची रविची देखभाल करते आहे.

त्या मुलाखतीमध्ये तुषारनं सांगितलं होतं की, मला माझ्या चॉईसवर कुठलाही संशय नाही. मात्र मला ज्यावेळी लग्नावरुन प्रश्न विचारला जातो तेव्हा मला ते आवडत नाही. मला लग्न करायचे नाही हे मी अनेकदा सांगितले आहे. मला माझं भविष्य आणखी कुणाबरोबर शेअर करायचं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT