Rajesh Khattar  Team esakal
मनोरंजन

कोरोनात पैसे संपले, अभिनेत्याच्या पत्नीनं सांगितलं वास्तव

कोरोनाचा प्रतिकूल परिणाम बॉलीवूडरही झाला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं सर्वांपुढे मोठा प्रश्न निर्माण केला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. हातातून रोजगार गेला आहे. बेकारीची कु-हाड अनेकांवर कोसळली आहे, सक्तीनं नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे. याचे कारण कोरोना असल्याचे अनेकांनी मान्यही केले आहे. कोरोनाचा प्रतिकूल परिणाम बॉलीवूडरही झाला आहे. निर्माते, दिग्दर्शक यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. अनेक कलाकारांना पैशांची चणचण जाणवू लागली आहे. टीव्ही अभिनेता तसेच व्हॉईस आर्टिस्ट म्हणून प्रसिध्द असणा-या कलावंताच्या पत्नीनं (wife ) आपली वेदना लोकांसमोर मांडली आहे. (tv actor rajesh khattars wife says they have used up almost all their life savings over last two years )

अभिनेता आणि व्हॉईस आर्टिस्ट राजेश खट्टर (tv actor rajesh khattars ) यांच्या पत्नीनं कोरोना काळात आपल्याला कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागल्याचे सांगितले आहे. आपल्याला वाटते तेवढी परिस्थिती आलबेल नसून कलाकारांनाही मोठ्या आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागते आहे. राजेश यांची पत्नी वंदना सजनानी यांनी सांगितले आहे की, आमची आर्थिक परिस्थिती काही ठिक नाही. गेल्या वर्षांपासून टेलिव्हिजन शो बंद पडले आहेत. सध्या तरी ते रिपिट टेलिकास्टवर सुरु आहेत. त्याचा फटका अनेक कलाकारांना बसला आहे.

कलाकारांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. सध्याच्या परिस्थितीत कित्येक मालिकांच्या निर्मात्यांनी परदेशात चित्रिकरणाला सुरुवात केली होती. मात्र त्यांनाही कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. प्रसिध्द टीव्ही कलाकार राजेश खट्टर यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या पत्नीनं सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे कुटूंब हे मेडिकल ट्रीटमेंटसाठी पैसे खर्च करत आहे. त्यात सेव्हिंगचे पैसे (life savings over ) खर्च झाले आहेत.

एका मुलाखतीत राजेश खट्टर यांनी सांगितले होते की, माझ्या परिवारातील एकाला रुग्णालयात बेड हवा होता. मात्र त्याला तो मिळाला नाही. हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखं होतं. त्याला बेड मिळवून देणं ही सर्वात अवघड गोष्ट होती. राजेश यांच्या पत्नीनं सांगितलं की, राजेश यांच्याजवळ काहीच काम नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांची सेव्हिंग्जमधील पैसे वापरावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT