TV Actress Chandrika Saha’s 21-year-old husband bangs infant son against floor Esakal
मनोरंजन

Chandrika Saha: CID फेम अभिनेत्रीच्या पतीने दिड वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटलं! धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद...

Vaishali Patil

'अदालत', 'सीआयडी', 'सावधान इंडिया', 'क्राइम अलर्ट' यांसारख्या शोमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री चंद्रिका साहा हिने तिचा पती अमन मिश्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने १५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून जखमी केल्याचा आरोप तिने केला आहे.

(TV Actress Chandrika Saha’s 21-year-old husband bangs infant son against floor)

बेडरूममध्ये जमिनीवर मुलाला जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर अभिनेत्रीने बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही क्रुर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून रेकॉर्डिंग तिने पोलिसांना दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन मुलाच्या जन्माने खूश नव्हता. तिने मुलाला रडताना पाहिले होते आणि तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यावर तिला समजले की तिच्या पतीने मुलाला जमिनीवर तीनदा आपटले होते. बाळाला मालाड पश्चिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, 2020 मध्ये जेव्हा 41 वर्षीय चंद्रिकाचा घटस्फोट झाल्यानंतर तिची 21 वर्षीय अमनशी भेट झाली. यानंतर दोघांचे अफेअर झाले आणि त्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचे त्यांना समजले.

चंद्रिकाने गर्भपात करावा अशी अमनची इच्छा होती, पण डॉक्टरांनी तिला तसे न करण्याचा सल्ला दिला.

यानंतर बाळाच्या जन्माच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. अखेर गेल्या महिन्यात त्यांचे मूल १४ महिन्यांचे झाल्यावर दोघांनी लग्न केले. मात्र तरीही अमन मुलाच्या जन्मामुळे खुश नव्हता.

या घटनेनंतर मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमनने या घटनेनंतर तिथून पळ काढला.

यानंतर अभिनेत्रीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. बाल न्याय कायद्याच्या कलम 75 अंतर्गत अमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांगूर नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT