TV Actress Kanishka Soni Pregnant? Read Inside Story,Truth.. Instagram
मनोरंजन

Kanishka Soni: स्वतःशीच लग्न केल्यानंतर अभिनेत्री दोनच महिन्यात प्रेग्नेंट? काय आहे गौडबंगाल? वाचा..

टी.व्ही अभिनेत्री कनिष्का सोनीनं सोशल मीडियावर आपण कोणत्याही पुरुषाशी नाही तर स्वतःशीच लग्न केल्याचं सांगून खळबळ उडवून दिली होती.

प्रणाली मोरे

Kanishka Soni Pregnant: टी.व्ही अभिनेत्री कनिष्का सोनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत होती ते तिनं स्वतःशीच लग्न केल्यामुळे. तिनं सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर केला होता,ज्यात तिनं भांगात सिंदूर लावलं होतं, गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि फोटो शेअर करत जाहीर केलं होतं की तिनं स्वतःशीच लग्न केलं आहे. आता तिचे काही फोटो समोर आले आहेत,ज्यावरनं लोक दावा करत आहेत की ती प्रेग्नेंट आहे. आता यात खरं काय,खोटं काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.(TV Actress Kanishka Soni Pregnant? Read Inside Story,Truth)

आठवड्याभरापूर्वी कनिष्का सोनीनं न्यूयॉर्कहून दोन रील पोस्ट केल्या होत्या. त्यामध्ये तिनं पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. आता टी-शर्टचा कपडा थोडा हलक्या दर्जाचा असल्या कारणानं तिचं पोट थोडं पुढे आल्यासारखं दिसत होतं. त्यावरनं लोकांनी मात्र ध चा मा केला. त्यांना वाटलं की ती प्रेग्नेंट आहे. ही गोष्ट जेव्हा अभिनेत्रीला कळली तेव्हा तिनं पुन्हा यावर स्पष्टिकरण देत एक पोस्ट केली.

कनिष्का सोनीनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो त्याच जागेवर तिनं क्लीक केलेत जिथं तिनं आधीचा व्हिडीओ शूट केला होता. तसंच, तिनं तेच कपडे त्या फोटोत घातले आहेत,ज्यात तिचं पोट बाहेर आलेलं दिसत आहे. तिनं लिहिलं आहे की-''मी सेल्फ मॅरिड असले तरी सेल्फ प्रेग्नेंट नाही. हे फक्त अमेरिकेतला चविष्ट पिझ्झा,बर्गर खाल्याकारणानं झालं आहे. यामुळेच माझं वजन थोडं वाढलं आहे. पण मी खूप एन्जॉय करतेय. आणि वजन वाढल्याचं मला दुःख नाही''.

माहितीसाठी इथे थोडं नमूद करते की, कनिष्का सोनीनं 'दीया और बाती हम' मालिकेत सूनेची व्यक्तिरेखा साकारली होती,ज्यामुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. याव्यतिरिक्त 'दो दिल एक जान' मध्ये मंजरी सत्या आणि 'देवों के देव महादेव' मध्ये सतीची बहीण रेवती या प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. तसंच, 'महाभारत' मध्ये ती विधूरची पत्नी बनली होती. 'बेगुसराय' मालिकेमध्ये माया ठाकुर,'संकटमोचन महाबली हनुमान' मध्ये सुमित्रा आणि 'कुल्फी कुमार बाजेवाला' मध्ये इन्स्पेक्टर रेडकर ची व्यक्तिरेखा तिनं साकारलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

प्रिया अर्जुनला जेलमध्ये अडकवणार ! मालिकेतील नव्या ट्विस्टने प्रेक्षकांना बसला धक्का "आता सायली.."

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

SCROLL FOR NEXT