tv actress nausheen ali sardar reveals sima taparia refused to find her a groom because she was a muslim 
मनोरंजन

'चांगल्या जोडीदाराच्या शोधात, मुस्लिम असल्यामुळे कुणी मदतीला येत नाही',

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मालिका आणि चित्रपट विश्वात सगळं काही आलबेल आहे असं म्हणणं चूकीचं ठरेल. अनेक कलाकारांना यापूर्वी वेगवेगळ्या कारणांमुळे वादाला सामोरं जावं लागलं आहे. मागील वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात नेपोटिझम चालते. असे म्हटले गेले होते. त्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. आताही असाच एक वाद समोर आला आहे. त्यामुळे नेटक-यांमध्ये वेगळ्या प्रकारची भावना आहे. अजूनही अशाप्रकारची उदाहरणं बॉलीवूडमध्ये आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. नौशीन अली सरदारनं आपण एका चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहोत असे विचारले आहे. त्यावर तिला जो अनुभव आला तो धक्कादायक म्हणावा लागेल.

छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री म्हणून नौशीन अली सरदारचं नाव आहे. ती सध्या जोडीदाराच्या शोधात आहे. तिच्या परिवारातले अनेक सदस्य तिच्यासाठी वराच्या शोधात आहे. मात्र नौशीनला आपल्या पसंतीचा वर हवा आहे. त्यासाठी ती आणखी वाट पाहायलाही तयार आहे. चांगल्या मुलाच्या शोधार्थ तिनं आता मॅचमेकर सीमा तापडीया उर्फ सीमा आंटीशी संपर्क साधला आहे. मात्र सीमा आंटीनं तिला याकामी मदत करण्यास नकार कळवला आहे. सीमा आंटीनं 2020 मध्ये आपल्या मॅचमेकरमुळे अनेक जणांकडून लोकप्रियता मिळवली होती. ती चर्चेतही आली होती. आता तिनं नौशीनला तिचं लग्न जमवून देण्यासाठी नकार दिला आहे. त्याचे कारण म्हणजे ती वेगळ्या धर्माची आहे.

सीमा आंटीनं आपल्याला नकार दिल्याची माहिती नौशीननं पिंकविला नावाच्या एका वेबसाईटला दिली आहे. त्यावेळी तिनं अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. नौशीननं सांगितलं की, तिच्या कुटूंबामध्ये सध्या सगळेजण तिच्यासाठी मुलाच्या शोधात आहे. त्यांनी तयारीही सुरु केली आहे. त्यासाठी तिनं सीमा आंटीशी संपर्क साधला होता. मात्र सीमा आंटीनं सांगितलेल्या कारणामुळे नौशीनच्य़ा परिवारातले सदस्य आश्चर्यचकित झाले होते. ज्यावेळी नौशीननं तिला आपलं नाव तिच्या एजेन्सीमध्ये रजिस्टर करायला सांगितले तेव्हाही सीमानं तिला नकार दिल्याचे नौशीननं सांगितले. 
यासगळ्याचे कारण म्हणजे तुझा धर्म आहे. लॉकड़ाऊननंतर माझ्या घरच्यांनी मला एखाद्या मॅट्रोमॉनिअल साईटवर नाव रजिस्टर करण्यास सांगितले होते.

मात्र त्यावेळी माझी परिस्थिती विवाहयोग्य नव्हती. त्यामुळे मी सीमा आंटीशी संपर्क केला होता. नौशीन म्हणाली, मला सीमा आंटीनं स्पष्टपणे असे सांगितले होते की, मॅचमेकिंगसाठी माझ्याकडे मुसलमान आणि कॅथलिक यांच्यासाठी काहीही नाही. हे पाहिल्यावर आणि ऐकल्यावर मला धक्काच बसला. आजच्या काळातही असे घडू शकते. याचे आश्चर्य वाटले. मला माहिती नव्हते की सीमा आंटी अशाप्रकारच्या मानसिकतेची व्यक्ती आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT