TV actress nitya sasi The Arrested Linked To Honeytrap And Extortion Case SAKAL
मनोरंजन

Nitya Sasi: सुप्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, अश्लील फोटो दाखवून वृद्धाकडून ११ लाख उकळले, वाचा संपूर्ण प्रकरण

कथित हनी ट्रॅपिंगसाठी टीव्ही अभिनेत्री आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आलीय.

Devendra Jadhav

Nitya Sasi Arrested News: कथित हनी ट्रॅपिंगसाठी टीव्ही अभिनेत्री आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आलीय. परावूरमध्ये, एका वृद्ध व्यक्तीने एका टेलिव्हिजन अभिनेत्री आणि तिच्या मित्रावर हनीट्रॅपिंग करून 11 लाख रुपये उकळल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

(TV actress nitya sasi The Arrested Linked To Honeytrap And Extortion Case)

नित्या सासी आणि बिनू (४८) हे आरोपी आहेत ज्यांना पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणात अटक केलीय. पट्टम, तिरुवअनंतपुरम येथील ७५ वर्षीय माजी सैनिक आणि केरळ विद्यापीठाच्या माजी कर्मचाऱ्याकडून ११ लाख रुपये उकळल्याच्या आरोपाखाली तिला अटक केली आहे.

नित्याने घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने ७५ वर्षीय माजी सैनिकाशी संपर्क साधला. पुढे 24 मे पासून ही घटना घडली. नित्याने घरी जाऊन त्या वृद्धाशी मैत्री केली. तक्रारीनुसार, नित्याने त्याला घरात धमकावले आणि कपडे उतरवण्यास भाग पाडले आणि तिने त्याचे स्पष्ट फोटो काढले. या सर्व प्रकरणात नित्याचा मित्र बिनूसुद्धा हे फोटो काढण्यात सहभागी होता.

पुढे मग याच फोटोंचा वापर करून या दोघांनी त्या वृद्धाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली आणि २५ लाख दिले नाहीत तर हे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. वारंवार धमक्यांना कंटाळून त्या वृद्धाने त्यांना 11 लाख रुपये दिले. गुन्हेगारांनी आणखी पैशांची मागणी केल्यावर वृद्धाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि 18 जुलै रोजी परावूर पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अभिनेत्री नित्या आणि तिचा मित्र बिनू या दोघांना अटक झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

काय सांगता! 'सेल्फी मैंने ले ली आज' फेम ढिंच्याक पूजा अडकली लग्नबंधनात; नेटकरी म्हणाले- कुणाचे इतके वाईट दिवस आले की...

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Sangli Accident News : सांगलीचे नायब तहसीलदार दादासो पुकळेंची डॉक्टर मुलगीचे अपघाती निधन; कोकण पयर्टन बेतलं जिवावर

SCROLL FOR NEXT