Tv Actress Tunisha Sharma Death, Reason behind that.. Google
मनोरंजन

Tunisha Sharma Death: मालिका,चित्रपट सगळं काही मिळालं, मग आत्महत्या का?, पोलिसांना मिळाली तपासाची दिशा..

तुनिषा शर्मानं आत्नहत्या केली त्या मालिकेच्या सेटवर चौकशी केल्यानंतर काही मुद्दे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

प्रणाली मोरे

Tunisha Sharma Death: टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं शनिवारी आपली टी.व्ही मालिका 'अली बाबा दास्तां ऐ काबुल' च्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं,तरी मालिकेच्या सेटवर कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे मुद्दे लागले आहेत,ज्यानं तपासाची दिशा ठरवता येईल. तुनिषानं खरंच आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे यादिशेनं देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Tv Actress Tunisha Sharma Death, Reason behind that..)

केवळ २० वर्ष वयाची तुनिषा शर्मानं खूप कमी वेळात यश मिळवलं होतं. तुनिषानं अगदी कमी वयात ६ हून अधिक मालिका आणि ३ मोठ्या सिनेमात अभिनय केला होता. कमी वयात तिच्या वाट्याला प्रसिद्धी आली होती त्यामुळे तिच्या निधनाच्या बातमीनं सगळेच हैराण झालेयत. तुनिषानं शनिवारी आत्महत्येच्या काही तास आधीच मेकअप रुममध्ये शूट केलेला व्हिडीओ स्टेट्स ला ठेवला होता. आणि त्यानंतर काही तासातच तिनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आली.

तुनिा शर्मानं ६ हून अधिक मालिकांमध्ये काम केलं होतं. सध्या तुनिषा 'अली बाबा दास्तां ऐ काबूल' मध्ये मुख्य भूमिका साकारत होती. यासोबतच तुनिषा शर्मानं 'चक्रवर्ती अशोक सम्राट','गुब्बर पूंछवाला','भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप',' इंटरनेट वाला लव' आणि 'इस्क सुभानअल्लाह' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

इतकंच नाही तर तुनिषानं सिनेमांमधूनही आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे. तुनिषानं कतरिना कैफच्या 'फितूर' सिनेमात तिच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे कौतूकही झाले होते. तसंच,कतरिनाच्याच 'बार बार देखो' सिनेमात पुन्हा तिनं तिच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तुनिषानं 'कहानी २' मध्ये देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला होता.

तुनिषा सध्या कुठल्यातरी टेन्शनमध्ये होती अशी माहिती मालिकेच्या सेटवर चौकशी केल्यानंतर समोर आली आहे. पण त्या टेन्शनचं कारण मात्र समजलेलं नाही. तुनिषाच्या निधनाच्या बातमीनं टी.व्ही जगत नाही तर सिने जगतातही खळबळ उडाली आहे. केवळ २० वर्ष वयात इतकं यश,पैसा मिळूनही गळ्याला फास लावण्याचा विचार तुनिषाच्या मनात का आला याचाच विचार सगळे करत आहेत. पोलिस सध्या तपास करत आहेत. कदाचित लवकरच तुनिषाच्या आत्महत्येचं कारण समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT