Big Boss16 Esakal
मनोरंजन

Big Boss16: निमृत कौरच्या बॉयफ्रेंडची बिग बॉसमध्ये एंट्री? लोक म्हणताय, ‘बिचारा अब्दु’

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस हा शो सध्या रंगात आला आहे. टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉस 16 ने देशभरात चर्चेत आहे. या शोमध्ये बहुतेक टीव्ही सेलेब्स चा सहभाग आहे. टिना, सुंबुल तौकीर  त्याचबरोबर टीव्ही अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया देखील या शोची स्पर्धक आहे.

 निम्रत शोमध्ये चांगली खेळत आहे. तिची खेळी सर्वांनाच आवडत आहे. निम्रत बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन बनली होती. ज्यामुळे तिची फॅन फॉलोविंगही खूप वाढली आहे. तिच्या आणि अब्दु रोजिकसोबतच्या मैत्रीचीही बरीच चर्चा रंगली आहे. अब्दु नेहमी तिला तू माझी चांगली मैत्रीण आहेस असं म्हणत असतो आणि त्याला घरातील इतर लोकही चिडवत असतात.

दरम्यान, एक बातमी समोर की निमृत कौर अहलुवालियाचा बॉयफ्रेंड माहिर पांधी लवकरच बिग बॉस सीझन 16 मध्ये शोमध्ये प्रवेश करू शकतो. निमृत कौर अहलुवालिया ही माहिर पांधीला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. समोर आलेल्या माहिती नुसार तर माहिर, वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून, सलमान खानच्या शोमध्ये निम्रतला पाठिंबा देण्यासाठी येऊ शकते.

तर दुसरी कडे सोशल मीडियावर निम्रतचा रुमर बॉयफ्रेंड माहिरच्या एन्ट्रीवर चाहते वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स निर्मात्याच्या या निर्णयावर खूश असल्याचं दिसतेय तर  काहींना अब्दु रोजिकबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत. एकाने निम्रतचा बॉयफ्रेंड माहिरची वाईल्ड कार्ड एंट्री अब्दू रोजिकसाठी एक वाईट निर्णय असल्याचं म्हटंलय तर त्यावर मजेदार मीम शेअर होत आहे.

बिग बॉसच्या शेवटच्या एपिसोडमध्ये टीना दत्तामुळे शालीन भानोत आणि एमसी स्टेन यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. याभांडणात सुंबुल ही उतरली, त्यामुळे टीनासोबतचे त्यांच्या नात्याच दुरावा आल्याचं दिसतंय. 'फ्रायडे का वार'चा एपिसोड या चौघांभोवती फिरत होता.  शालीन, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यातील भांडणानंतर  घर दोन गटात विभागलं गेलं आहे. शालीन भानोतला प्रियंका आणि अंकित सपोर्ट करत आहेत. दुसरीकडे साजिद खान, टीना दत्ता म्हणतात की बिग बॉस बघून कारवाई करतील. त्यामूळे बिग बॉस काय निर्णय घेतो याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT