rashmi sonali 
मनोरंजन

बिग बॉस १४: रश्मी देसाईकडून झाली मोठी चूक, सगळ्यांसमोर मागावी लागली सोनाली फोगट यांची माफी

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- 'बिग बॉस'मध्ये सध्या सगळ्यांचा आवडता क्षण म्हणजेच फॅमिली वीक सुरु आहे. जिथे शोमधील स्पर्धकांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आले होते. मात्र कौटुंबिक तणावामुळे विकास गुप्ताला भेटायला त्याच्या घरातून कोणीही येऊ शकलं नाही. ज्यामध्ये बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई विकासला भेटायला पोहोचली. तिने घरात जाऊन विकास गुप्ताचा उत्साह वाढवला आणि त्याच्या गेमचं कौतुक केलं. रश्मिला घरात आलेलं पाहुन विकास देखील खूप भावूक झाला आणि रडायला लागला ज्यावर रश्मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते.  

ही गोष्ट वेगळी की आता रश्मी देसाईला 'बिग बॉस'च्या घरात जाणं महागात पडलं आहे आणि तिला सगळ्यांसमोर सोनाली फोगाट यांची माफी मागायला लागली आहे. त्याचं झालं असं की रश्मी देसाईला बिग बॉस घरातील नवीन कॅप्टन निवडण्याची संधी देतात. ज्यामध्ये रश्मी देसाईला सोनाली फोगट आणि राखी सावंतपैकी कोणा एकाचं नाव घ्यायचं होतं. तिथे रश्मी सोनाली फोगट यांचं नाव विसरते आणि राखी सावंतचं नाव कॅप्टन्सीसाठी घेते. मात्र रश्मीला सोनाली फोगटला कॅप्टन बनवायचं होतं.

सोनाली फोगट यांचं नाव विसरल्याने त्यांचे चाहते रश्मी देसाईला ट्रोल करायला लागले. मात्र रश्मीने याबाबत माफी देखील मागितली.रश्मी देसाईला ट्रोलिंगमुळे सगळ्यांसमोर माफी मागावी लागली. तिने सोशल मिडियावर तिची ही चूक कबुल केली. रश्मीने ट्विटरवर सगळ्यांसमक्ष माफी मागत लिहिलंय, 'सोनाली जी मी तुमची माफी मागते. मी तुमचं नाव विसरले होते. मात्र माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. तुम्ही अशाच पुढे जात राहा.'  

tv bigg boss 14 rashami desai apologies to sonali phogat know the reason  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन

Vasai Accident: शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबला; कारनं ९ जणांना उडवलं; वसईत होळीच्या रात्री थरार

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

Viral Video: आश्चर्यकारक तपश्चर्या! होळीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये तो थेट उतरला… पुढे जे घडलं ते पाहून सगळे थक्क

T20 World Cup: भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार नाही, संजू सॅमसन खेळला म्हणून उपांत्य फेरीत पोहोचले, नाहीतर...

SCROLL FOR NEXT