ankita lokhande and kangana ranuat  esakal
मनोरंजन

Lock Upp: अंकिता लोखंडेची 'गुड न्युज'? कंगनानं शेयर केलं सिक्रेट

Entertainment News: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना.

सकाळ ऑनलाईन टीम

Entertainment News: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना. (Tv Actress Kangana Ranaut) वाद आणि कंगना हे समीकरण तयार झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून बॉलीवूडच्या (Bollywood Actress) माफियांपर्यत कंगनानं अनेकांशी पंगा घेतला आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या सोबतचा तिचा वाद हा न्यायालयात पोहचला आहे. त्यावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे कंगनानं अनेक वाद ओढावून घेतले आहे. सध्या तिच्या लॉक अप नावाच्या शो ची चर्चा आहे. त्यामध्ये तिनं देशातल्या मनोरंजन विश्वातील कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सेलिब्रेटींना लॉक अप (Lock Upp) केलं आहे. हा शो सध्या टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्या शो मध्ये कंगनानं टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचं (Ankita Lokhande) सिक्रेट शेयर केलं आहे.

अंकिता देखील तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींमुळे देखील ती नेहमीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असते. काही दिवसांपूर्वी ती विकी जैनच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. त्यांनी लग्न केले. गेल्या वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला होता. आता या अभिनेत्रीनं आपल्या प्रेग्नंसीबाबत वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंकिता कंगनाच्या शो मध्ये आली होती. या शो मध्ये ती पाहूणी कलाकार म्हणून आली होती. त्यावेळी कंगनानं तिला तिचं सिक्रेट शेयर करायला सांगितलं होतं. तेव्हा अंकितानं जे सांगितलं त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या कमेंटस्ही केल्या आहेत. सुरुवातीला अंकितानं कंगनाला आपल्या आयुष्यामध्ये खास शेयर करावं असं कोणतही सिक्रेट नाही असं सांगितलं होतं.

त्यावर कंगनानं काहीतरी सिक्रेट असणारच असं म्हणून अंकिताला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी अंकितानं प्रेग्नंसीविषयी चाहत्यांना सांगितलं. विकीला देखील ही गोष्ट माहिती नव्हती. अंकिताची ही गोष्ट ऐकुन उपस्थित स्पर्धकांना धक्का बसतो. मात्र त्यानंतर अंकिता त्यांना सांगते की, मी तुम्हा सर्वांना एप्रिल फुल बनवले आहे. यावर कंगना म्हणते, पण आज तर एक एप्रिल तर नाही. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की, खरं काय आहे ते....तू जे खोटं सांगते आहेस ते लवकरच खरं होवो असे आम्ही म्हणतो. यावरही अंकितानं ते लवकरच होईल. असं सांगुन चाहत्यांना आणखी कोडयात टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT