Bharti Singh News  team esakal
मनोरंजन

भारती पोरगं महत्वाचं की काम? लगेच कामावर आलीस! नेटकरी संतापले

प्रख्यात कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) ही आता तिच्या मुलावरुन चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Entertainment News: प्रख्यात कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) ही आता तिच्या मुलावरुन चर्चेत आली आहे. यापूर्वी प्रेग्नंसीच्या बातमीमुळे ती सोशल (Social media news) मीडियावर लाईमलाईटमध्ये होती. प्रेग्नंसीनंतर दुसऱ्याच दिवशी ती कामावर परतल्यानं तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली (Viral news) आहे. केवळ तिलाच नाही तर तिच्या पतीला हर्ष लिंबाचियाला देखील नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीनं गुड न्युज देत (Harsh Limbachiya) चाहत्यांना दिलासा दिला होता. ती प्रेग्नंट असताना देखील कामावर गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन तिचं जेवढं कौतुक झालं तेवढयाच प्रमाणात तिच्यावर टीकाही झाली. आता भारतीनं पुन्हा सेटवर जाऊन नेटकऱ्यांचा राग ओढावून घेतला आहे.

कपिल शर्माच्या शो (The Kapil Sharma Show) मधून भारतीनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिनं कॉमेडी सर्कसमधून आपल्या नावाची वेगळी ओळख तयार करुन आपलं ब्रँण्डिंग केलं. गेल्या काही दिवसांपासून भारती ही चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिची प्रेग्नंसी. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रेग्नंसीच्या शेवटच्या दिवसांपर्यत भारती सेटवर असल्याचे सांगण्यात आले होते. तिची गुड़ न्युज ऐकल्यावर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. प्रेग्नंसी अकराव्या दिवसानंतरच तिनं पुन्हा सेटवर जाण्यास सुरुवात केल्यानं नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फैलावर घेतले आहे. भारती तुला मुल महत्वाचं आहे की काम, असा थेट प्रश्न तिला विचारला आहे. काहींनी तिला घरी आराम करण्याचा सल्लाही दिला आहे.

यावेळी भारतीनं काही मीडियाच्या प्रतिनिधींशी संवादही साधला. तेव्हा ती कमालीची भावूक झाली होती. तिनं सांगितलं की, मला तुमच्या सगळ्यांचा मोठा आशीर्वादही मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणता हे मला याची पूर्ण कल्पनाही आहे. मात्र त्यावरुन ज्याप्रकारे ट्रोल केले जात आहे ते वाईट आहे. आपण पातळी सोडून बोलता आहात ते पटण्यासारखे नाही. मी आता पुन्हा कामावर परतले आहे. त्यामुळे लोकांनी मला बोलायला सुरुवात केली आहे. मात्र मला कुणाचे आणि किती ऐकायचे हे चांगले कळते. तसेही मी नेहमी नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करण्यावर जास्त भर देते. असंही भारतीनं यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT