Mahabharat News: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकांना प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली होती त्यात रामायण आणि महाभारत या मालिकेच्या नावांचा उल्लेख करावा लागेल. बी आर चोप्रा, रामानंद सागर यांनी या मालिकांची निर्मिती केली होती. अनेक वर्षांपासून या दोन्ही मालिकांना मिळणारा प्रतिसाद अद्यापही (Tv Entertainment News) अबाधित आहे. कोरोनाच्या काळात देखील पुन्हा एकदा रामायण आणि महाभारत मालिकेचे प्रसारण काही चॅनेलवरुन करण्यात आले होते. रामायण, महाभारत मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांची नेहमीच चर्चा होत (Social media viral news) असते. कलाकारांच्या विविध आठवणींना चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.
महाभारतात काम करणाऱ्या कलाकारांच्या वेगवेगळ्या आठवणी काही मुलाखतींच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यातीलच एक गंमतीशीर प्रसंग आता समोर आला आहे. तो म्हणजे महाभारतात द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाचे चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर दुर्योधनाची भूमिका करणाऱ्या पुनित इस्सर यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं. रामायण आणि महाभारत या मालिकांची लोकप्रियता एवढी मोठी होती की, ज्यावेळी त्यांचे प्रसारण व्हायचे त्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट असायचा.
महाभारतातील द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाचे चित्रिकरण होत असताना गंमतीशीर घटना घडली होती. पुनित इस्सर ज्यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते तेव्हा त्यांनी तो किस्सा सांगितला. तो ऐकल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांना तर हसू आवरले नव्हते. त्याचं झालं असं की, पुनीत इस्सर यांनी द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग चित्रित केल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्याविरोधात अटकेचा वॉरंट निघाला होता. आपल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाल्याचे कळताच पुनीत इस्सर यांना धक्काच बसला होता.
बनारस येथील एका व्यक्तीनं त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्या व्यक्तीचे म्हणणे होते की, पुनीत इस्सर यांच्या त्या कृत्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे आपण त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तब्बल 28 वर्षानंतर ती केस पुन्हा एकदा कोर्टासमोर आली. त्यावेळी मला एका वकिलाची नेमणूक करावी लागली होती. असं पुनीत इस्सर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.