Mika Di Vohti Finalist esakal
मनोरंजन

Mika Di Vohti Finalist: आकांक्षा होणार मिकाची राणी? टॉप 3 मध्ये आहे कोण?

टीव्ही मनोरंजन विश्वात सध्या मिकाच्या स्वयंवराची चर्चा सुरु आहे. त्यानं आपल्याला कशी बायको हवी यासाठी जो शो सुरु केला आहे त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

युगंधर ताजणे

Mika Di Vohti Finalist: टीव्ही मनोरंजन विश्वात सध्या मिकाच्या स्वयंवराची चर्चा सुरु आहे. त्यानं आपल्याला कशी बायको हवी यासाठी जो शो सुरु केला आहे त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मिका दी वोट्टी या नावानं (tv entertainment news) त्या शोला आतापर्यत प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता हा शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन (entertainment trending news) स्पर्धक शेवटच्या फेरीत पोहचल्या असून यासगळ्यात आकांक्षाच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तिच मिकाची पत्नी होणार असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

आकांक्षा पुरी आणि मिका यांच्या केमिस्ट्रीनं आता मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून (bollywood news) घेतलं आहे. इंडिया फोरमच्या एका रिपोर्ट नुसार त्या तीनपैकी एकीशी मिका विवाहबद्ध होणार आहे. त्यात आकांक्षा पुरी, प्रांतिका दास आणि नीत महल यांच्या नावाचा समावेश आहे. त्या रिपोर्टनुसार मिका हा आकांक्षाशी लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वाइल्ड कार्डव्दारे आकांक्षा त्या शोमध्ये पोहचली. त्यानंतर तिनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. ती सध्या सर्वोत्तम तीनमध्ये आहे. मिकाचे चाहते तर आकांक्षाला विजेती झालेली पाहण्यास उत्सुक असल्याचे कळते आहे.

मात्र अद्याप मिकाकडून कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही महिन्यांपूर्वी मिका आणि आकांक्षाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरुन त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लढवले आहेत. मीका आणि आकांक्षा हे एकमेकांना दहावर्षांपासून ओळखतात. त्यामुळे ती विजेती होण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT