Shaktimaan Serial  
मनोरंजन

कोण असणार नवा 'शक्तिमान?' अभिनेत्याचा फोटो व्हायरल

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं लहानांपासून आबालवृद्धांवर गारुड केलं त्या शक्तिमान मालिकेची क्रेझ (Shaktimaan Serial) अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं लहानांपासून आबालवृद्धांवर गारुड केलं त्या शक्तिमान मालिकेची क्रेझ (Shaktimaan Serial) अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. आता या मालिकेचं नवं रुपांतर चाहत्यांसमोर येणार आहे. त्यावर चित्रपट निर्मिती होणार (Entertainment) असल्याचे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जगप्रसिद्ध सोनी या चित्रपट निर्मात्या कंपनीनं यावर चित्रमालिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. 90 च्या दशकामध्ये प्रदर्शित झालेल्या शक्तिमान या मालिकेमध्ये अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. नव्या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा अभिनेता दिसणार असून त्याविषयी मुकेश खन्ना यांनी माहिती दिली आहे. नुकतचं शक्तिमान चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.

मुकेश खन्ना (Actor Mukeh Khanna) यांची निर्मिती आणि अभिनय असणाऱ्या शक्तिमान या मालिकेचा चाहतावर्ग मोठा होता. आता त्या मालिकेवर चित्रपट निर्मिती होणार असल्याचे कळताच चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. गंगाधर आणि शक्तिमानची भूमिका अजरामर कऱणाऱ्या मुकेश खन्ना यांची जागा नव्या चित्रपटामध्ये कोण घेणार असा प्रश्न लाखो चाहत्यांना पडला होता. आता त्या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना मिळाले आहे. जेव्हा टीझर प्रदर्शित झाला होता तेव्हापासूनच चाहत्यांनी त्या पोस्टवर नवा शक्तिमान कोण असणार असा प्रश्न उपस्थित केला होता. आता त्याचे उत्तर चाहत्यांना मिळाले आहे.

मुकेश खन्ना यांचा एक फोटो वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नकूल मेहता (Nakuul Mehta) हा शक्तिमानची भूमिका करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुकेश यांच्यासोबत तो दिसतो आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी अंदाज बांधला आहे की, हाच आगामी शक्तिमान असणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शक्तिमानच्या टीझरवर मुकेश खन्ना यांनी पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये त्यांनी मी आता पुन्हा आलो आहे. अशा प्रकारे चाहत्यांना आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT