Urfi News  esakal
मनोरंजन

Urfi Javed: 'बिचारीकडं कपडे पण नाहीत! तारांनी तयार केलेला ड्रेस गुंडाळून आली...'

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या हटक्या स्टाईलसाठी ओळखली जाते.

युगंधर ताजणे

Tv Entertainment news: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या हटक्या स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या हटके ड्रेसनं सोशल (Social media viral video) मीडियावरुन नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीला ड्रेसिंगसाठी काहीही पुरतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता नेटकऱ्यांनी (Actress Urfi Javed) दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उर्फीचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशुट व्हायरल झाले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केल्याचे दिसून आले आहे. आताही सोशल मीडियावर उर्फीचे ध्यान पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. त्यांनी तिच्यावर टीकाही केली आहे.

एक दिवस उर्फीच्याबाबत असा जात नाही की, ती त्यादिवशी ट्रोल झालेली नाही. (Bollywood News) सोशल मीडियावर उर्फीला नेहमीच चाहत्यांकडून मिश्किल प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी उर्फीनं सर्वांगाला फुलं लावून एक फोटोशुट केलं होतं. आता तर तिनं तारांनी तयार केलेला ड्रेस गुंडाळून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी सडकून तिच्यावर टीका केली आहे. इंस्टावर उर्फीच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. काही तासांपूर्वी शेयर केलेल्या त्या फोटोंवर (Viral News) नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर शेकडो लाईक्सही आले आहेत. इंस्टावरील उर्फीच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना खुश केलं आहे.

उर्फीच्या त्या व्हिडिओला आतापर्यत 29 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. त्यावर कमेंट्सही दिल्या आहेत. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना उर्फीनं लिहिलं आहे की, तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे. ही तार आहे. आणि तारेनं बनवलेला ड्रेस मी परिधान केला आहे. मी वेगवेगळ्या रंगामध्ये तयार केलेले ड्रेस परिधान करणार आहे. ते पाहून आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे मला सांगायला विसरु नका. असे उर्फी म्हणते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT