Archana Pooran Singh
Archana Pooran Singh  esakal
मनोरंजन

Kapil Sharma Show: खुर्चीवर बसुन हसण्याचे अर्चनाला मिळतात एवढे पैसे

युगंधर ताजणे

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये अमाप लोकप्रियता असणारा टीव्ही शो म्हणून कपिल शर्माच्या कॉमेडी शो चा उल्लेख करावा लागेल. सोशल (Viral news) मीडिय़ावर हा शो नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांवर हा शो वरुन मोठे वाद झाल्याचेही समोर आले आहे. कॉग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धु (Navjyot singh Siddhu) आणि अर्चना पुरन सिंग (Archana Pooran Singh) हे त्या शो मध्ये परिक्षक आहेत. या दोन्ही परिक्षकांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांना फॅन फॉलोअर्सही आहेत. अर्चना पुरन सिंग या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत होत असतात. नवज्योत सिंग सिद्धु यांना पंजाबच्या विधानसभा निवडणूकीमध्ये अपयश आल्यानंतर त्यावरुन अर्चना पुरन सिंग यांना ट्रोल करण्यात आले होते.

नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यानंतर देखील अर्चना पुरन सिंग मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी करत नाही. कुणाला त्याबाबत बोलतही नाही. त्या कायम हसत असतात. कपिल शर्माच्या शो मध्ये केवळ त्या खुर्चीवर बसुन हसण्यासाठी निर्माते अर्चना यांना मोठी रक्कम देतात. बॉलीवूड़मध्ये आतापर्यत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये कॉ़मेडी भूमिका करणाऱ्या अर्चना पुरनसिंग यांच चाहतावर्ग मोठा आहे. कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी स्वताची वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. या स्टोरीच्या निमित्तानं आपण अर्चना पुरन सिंग या किती कोटींच्या मालकीण आहेत हे जाणून घेणार आहोत.

मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना पुरन सिंग कपिल शर्माचा एक शो शुट करण्यासाटी दहा लाख रुपये घेतात. अर्चना यांना एवढे पैसे केवळ त्या खुर्चीत बसण्याचे आणि हसण्याचे मिळतात. अर्चना यांचा मुंबईपासून जवळ असणाऱ्या मढ आयलंड जवळ एक मोठा बंगला आहे. त्यात त्या आपल्या परिवारासोबत राहतात. अर्चना यांच्याजवळ 220 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सर्वात पहिल्यांदा अर्चना या सर्कस नावाच्या कॉमेडी शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. तर चित्रपट अभिषेक पासून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यु केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT