rakesh bapat and shamita shetty  esakal
मनोरंजन

'ती आता...' शमिता शेट्टीसोबतच्या ब्रेक अपवर राकेशची पहिली प्रतिक्रिया

टीव्ही अभिनेता राकेश बापट (Rakesh Bapat) आणि अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

युगंधर ताजणे

Tv Entertainment : टीव्ही अभिनेता राकेश बापट (Rakesh Bapat) आणि अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या दोन्ही सेलिब्रेटींना (Entertainment News) विचारले होते. गेल्या बिग बॉसच्या सीझनमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या लवस्टोरिनं अनेकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. आताही त्या दोघांची लवस्टोरी चर्चेतील विषय आहे. त्यावरुन राकेशनं दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आहे. सध्या शमिता आणि राकेशमध्ये ब्रेक अपची चर्चा आहे. अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या आहे. त्यावरुन राकेशनं प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये शमिता आणि राकेशनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहे. मात्र अचानक त्यांच्या ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यावर राकेशनं अशाप्रकारे बातम्या व्हायरल करणाऱ्य़ांना चांगलेच झापले आहे. तो म्हणाला, ती माझी चांगली मैत्रीण आहे. त्यावरही नेटकऱ्यांनी त्याला फक्त चांगली मैत्रीण का...असं विचारत ट्रोल केले आहे. हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राकेशनं शमिताशी संबंधित अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. आमच्या नात्याविषयी सांगायचे झाल्यास, ती आता माझी चांगली मैत्रीण आहे असं म्हटलं आहे. त्याच्या या प्रतिक्रियेनं नेटकरी आणखी कोड्यात पडले आहेत.

मला एका गोष्टीचा आनंद आहे की, शमिता सारखी मुलगी माझी सगळयात जवळची मैत्रीण आहे. तुमची मैत्री एवढी घनिष्ठ हवी की, आणखी कशानं त्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडता कामा नये. मी त्याला फक्त एक नातं असं म्हणणार नाही. तर त्याला बाँड असे म्हणेल. तो जपण्याचा दोघांकडून प्रयत्न व्हायला हवा. ई टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉसचे लव बर्डस राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्यात आता काही आलबेल नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम झालं होतं, मात्र आता त्यांचे ब्रेक अपदेखील झाले आहे. त्यांच्यात काही गोष्टीवरुन भांडणं झाली आहेत. शमिताचे म्हणणे आहे की, राकेशनं मुंबईत शिफ्ट व्हावं. पत्नी रिद्धी डोगरापासून विभक्त झाल्यावर तो पुण्यात स्थायिक झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT