Bigg Boss16 Abdu Rojik  Esakal
मनोरंजन

Bigg Boss16: साजिदने अब्दूचे कपडे काढले अन् नेटकऱ्यांनी त्यांची 'लाज'

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 हा लोकप्रिय शोमध्ये अब्दु रोजिक हा एकमेव स्पर्धक आहे जो चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. घरात आणि बाहेरही त्याचा चाहता वर्ग खूप आहे. पण आता या चिमुकल्या अब्दूचे प्रेम निम्रत कौरवर आले आहे. अब्दूला निम्रत खूप आवडते.

खरं तर नुकताच निम्रत कौर अहलुवालियाचा वाढदिवस होता. निम्रतचा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी अब्दूला काहीतरी खास करायचं होतं. त्यामुळे अब्दू शिव ठाकरे आणि साजिद खानला सांगतो की त्याला निम्रतसाठी काहीतरी खास करायचं आहे. यावर साजिद आणि त्याच्या टोळक्याने त्यांना आधी कल्पना दिली. जे अब्दुने करण्यास नकार दिला.

साजिद-शिव यांच्या ग्रुपने अब्दूचे कपडे काढले आणि त्याच्या पुढच्या अंगावर हॅपी बर्थडे निम्मी लिहिले आणि मागच्या बाजूला लिपस्टिक आणि गलिच्छ संदेश लिहिले. अब्दूचा मेसेज पाहून निम्रतला खूप आनंद होतो. दुसरीकडे, अब्दूच्या पाठीवर लिहिलेल्या संदेशावर शिव, साजिद आणि इतर सदस्यही हसताना दिसत आहेत, ज्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

साजिद खानच्या या कृतीनंतर सोशल मीडिया यूजर्सनी साजिद खानची शाळा घेतली. युजरने लिहिले की, 'साजिद लाज वाटली पाहिजे, अब्दूला हिंदी समजत नाही. आम्हाला हा विनोद आवडला नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, 'ही गुंडगिरी नाही तर दुसरे काय आहे? इतकेच नव्हेतर साजिद खानवर कारवाई करण्याची मागणीही अनेक जण सलमान खानकडे करत आहेत. नेटकऱ्यांसोबतच आता मोठमोठे कलाकारांनीही अब्दूला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Putrda Ekadashi 2025: वर्षाच्या शेवटच्या एकादशीला, 'या' राशीच्या लोकांचे भाग्य होईल उज्वल, सुखसोयी वाढतील

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

SCROLL FOR NEXT