Big Boss 16   esakal
मनोरंजन

Big Boss 16: 'मला तुझी गरज नाही'! शालीन अन् सुंबुलमध्ये बिनसलं...

तर दुसरीकडे अब्दू रोजिक झालाय भावूक...

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस 16' हा शो आता रंगात येत आहे. सर्व स्पर्धकांचे खरे चेहरे आता उघड होत आहे. या शोमध्ये एकीकडे नाती बनतात आणि काही क्षणात तुटतात. कधी प्रेमळ नाती दिसतात तर कधी तुफान राडे होतात. घरातील भांडण, मैत्रीपासून प्रेमकहाणीपर्यंत अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत.सध्या बिग बॉसमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. शालीन आणि सुंबूलमध्ये वाद झालेला दिसतोय.

यापूर्वीही त्याच्यात वाद झाल्याचे दिसले होते. शालिन भानोत आणि सुंबूल तौकीर खान यांच्यातील जवळीक खूप प्रसिद्ध झाली मात्र, अचानक शालीनने सुंबुलपासून स्वतःला दूर करत तिला एकटे सोडलं. अनेकवेळा शालीनने सुंबूलला बालिशपणाबद्दल ओरडला आहे. त्यातच बिग बॉसच्या आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये शालीन आणि सुंबुल हे दोघेही जोरदार वाद करतांना दिसत आहेत.या प्रोमोमध्ये सुंबुल शालीनवर रागावलेली दिसते.

शालीन तू का रागवली असं विचारतोय. त्यावर तिच्या बाजूने भूमिका न घेतल्याने सुंबुल तौ खूप नाराज असल्याच ती म्हणते की तुला एकदाही वाटलं नाही की मला सेफ करावं. ज्यावर शालीन म्हणतो मी मूर्ख नाही. सुंबुल काहीही समजुन घेण्यास तयार नसते.तयार नाही. यावर शालीनला राग येतो आणि तो म्हणतो अगं वेडी तुला कळतंय का?, ‘मला तुझी गरज नाही’. त्याच्या या संभाषणावरुन दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसतेय. त्याच्या नात्यात दुरावा निर्माण झालेला दिसतोय. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा केमेंस्ट्री दिसेल कि नाही हे पुढच्या काही भागांत समजेलचं...

बिग बॉसच्या घरातलं पहिलं एलिमिनेशन श्रीजीता डेचं झालं आहे आणि आता जसजसा शो रंगात येत आहे तसंतसं इतर सदस्यांचेही नॉमिनेशन केलं जात आहे. आताचं बिग बॉसने स्पर्धकांना हॉरर नॉमिनेशन दिलं होतं. ज्यामध्ये त्यांना जोडीने नॉंमिनेशनसाठी आणि खेळाडू निवडतीलं या टास्कमध्ये गौतम आणि सुंबुल यांनी अब्दू रोजिक यांना नॉमिनेट केले. यावर अब्दूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पण त्यानंतर तो त्याच्या मित्रांकडे जातो आणि त्यांना सांगतो की सुंबुल आणि प्रियांका त्याचे शत्रू झाले आहेत. अब्दूच्या या बोलण्यावर बाकीचे स्पर्धकही भावूक झाले होते. अब्दु आणि शिव यांच्यातील प्रेमळ मैत्री पाहिल्यानंतर तमाम चाहत्यांचे डोळेही ओलावले. अब्दू आणि शिवाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #shibdu हे ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ethanol Blended Petrol : 'इथेनॉलशिवाय कारखानदारी टिकणे अवघड'; मुख्यमंत्री फडणवीसांनी पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान कसं होतं तेही सांगितलं!

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

Yavatmal Loan Waiver Issue: कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT