Bigg Boss16 esakal
मनोरंजन

Bigg Boss16: सलमान इज बॅक! सुंबुल आणि अंकितची काढली खरडपट्टी...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉसमध्ये खरी रंगत ही सलमान खानमूळेच असे त्याच्या चाहत्यांना वाटते आणि ते खरे देखील आहे. शोचे चाहते 'वीकेंड का वार' पेक्षा सलमान खानची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. सलमान खान डेंग्यूने त्रस्त असल्याने गेल्या आठवड्यातील 'वीकेंड का वार' होस्ट करू शकला नाही त्याच्या जागी करण जोहरने शोची धुरा सांभाळली.

मात्र करण प्रेक्षकांचं पाहिजो तस मनोरंजन करु शकला नाही. याच कारणामुळे 'बिग बॉस'चे चाहते सलमान खानला मिस करत होते. सलमान खान आता बरा झाला असून तो इतकेच  'वीकेंड का वार' या एपिसोडच्या शूटिंगलाही परतला आहे.

 या शोचा प्रोमो नुकतीच पोस्ट झाला आहे. ज्यात सलमान त्याच्या जून्या अवतारात दिसतोय. येताच त्याने सुंबुल तौकीर खान, अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी यांचा जोरदार क्लास घेतल्याचे दिसतेय.

सलमान 'वीकेंड का वार'मध्ये सुंबुलला पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न करतांना दिसतोय. प्रोमोमध्ये सलमान खान तिला म्हणताना दिसतोय की, 'सुंबूल, आजच्या तारखेत तू एक उदाहरण बनत आहेस. जी कुणाच्याही मागे लागते,रागवते,चिडते आणि नंतर रडत बसते. तु अशीच आहे का की तुलाच पहिल्यांदा कळतंय की तु अशी आहे. यानंतर सलमान सुंबुलला लिव्हिंग एरियापासून बेडरूम पॅसेजपर्यंत चालायला लावतो. मग तो तिला सांगतो, 'अशाच प्रकारे तु प्रत्येक एपिसोडमध्ये मागेच दिसते.' अशाप्रकारे सलमान सुंबुला चांगलच फटकारतो.

त्यानंतर सलमान अंकित आणि प्रियंकाकडे वळतो. सलमान प्रियांकाला म्हणतो, 'प्रियांका, तूच बिग बॉसला सांगितलं की अंकित आतून खूप मजबूत आहे. पण, आम्हाला कसे कळेल? एक्स-रे घ्यायचे? अंकित, तू कम्फर्ट झोनमध्ये चालला आहेस. तु इथ का आला आहेत?त्यावर अंकित म्हणतो की हा शो जिंकायला त्यावर सलमान म्हणतो मला तर असं वाटत नाही असं  तुला बघून आम्हांला वाटतं तुला इथे राहावंसं वाटत नाही का? असं वाटतंय की तुला जबरदस्तीने इथ ठेवलं आहे.  

'बिग बॉस'च्या निर्मात्यांनी 'बिग बॉस'च्या आगामी भागाचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये कतरिना आणि सलमान खान एकत्र धमाल करताना दिसत आहेत व्हिडिओत कतरिना कैफ सलमान खानला तिच्या 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर डान्स शिकवताना दिसतेय आणि सलमान खान तिला फॉलो करतांना दिसत आहे. कतरिना तिचा आगामी चित्रपट फोन भुतच्या प्रमोशनसाठी बिगबॉसच्या शोमध्ये गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT