Ankit Siwach Google
मनोरंजन

छोट्या पडद्यावरील अभिनेत्याकडे 'न्यूड फोटो'ची डिमांड केल्यानं उडालीय खळबळ

इंडस्ट्रीमध्ये जवळपास प्रत्येक अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला कधी ना कधी या कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतोच.

प्रणाली मोरे

बॉलीवूड (Bollywood)आणि टी.व्ही इंडस्ट्रीतही चालणारा कास्टिंग काऊच(Casting Couch) हा प्रकार भयंकर आहे. इंडस्ट्रीमध्ये जवळपास प्रत्येक अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला कधी ना कधी या कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतोच. काही जण याविषयी स्पष्ट समोर येऊन बोलतात तर काहीजणं गप्प राहणं पसंत करतात. याचसंदर्भातला एक कटू अनुभव छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितला आहे. अभिनेत्याला एक भूमिका देण्याबदल्यात न्यूड फोटोंची डिमांड केली होती.

छोट्या पडद्यावर इश्कबाज,बेहद २ आणि लाल इश्क या मालिकेतनं लीड भूमिका साकारणारा अंकित सिवाचनं(Ankit Siwach) एका मुलाखतीत या कास्टिंग काऊचविषयी मोठा खुलासा केला आहे. युपी मधील मेरठ मधनं आलेल्या अंकितने मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्या सुरुवातीच्या दिवसांतल्या स्ट्रगलमुळे खूप वाईट अनुभवांना सामोरं जावं लागल्यानं त्यानं इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.

अंकित म्हणाला, ''सीरियल मध्ये काम देण्याचं आमिष दाखवत खूप विचित्र पार्ट्यांना बोलवलं जायचं''. तो म्हणाला,''मला पहिलं वाटायचं प्रत्येकजण चांगला आहे,म्हणून मी काही गोष्टींकडे ठरवून दुर्लक्ष करायचो. पण एकदा चक्क माझ्याकडे न्यूड फोटोची डिमांड केली गेली तेव्हा मात्र मला मोठा धक्क बसला होता''.अंकित पुढे म्हणाला,''मला अनेकादा विनावस्त्र काढलेले फोटो पाठवायला सांगायचे. मला अशा पार्ट्यांना बोलावलं जायचं ज्याचं कामाशी काही संबंध नसायचा. एका पद्धतीची पिळवणूक होती ती,ज्यासाठी मी तयार नसायचो''. मेरठहून दिल्लीला येऊन स्ट्रगल करणाऱ्या अंकितनं सांगितलं की,'' माझ्यासोबत दिल्लीत असताना जे काही झालं त्यामुळे मी खूप मोठ्या अडचणींचा सामना करायला आता तयार आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP: ना परीक्षा, ना शारीरिक चाचणी; खेळाडूंना शैक्षणिक पात्रतेतही सूट! दरवर्षी निघणार पोलीस उपनिरीक्षकांची पदे

Latur: लातूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके; तापमान ३८ अंशांवर; औराद शहाजनी चाळिशीच्या उंबरठ्यावर

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

Mahabaleshwar ST Bus: महाबळेश्वरमध्ये नव्या एसटी बसची एंट्री; आकर्षक लूकला पसंती, आसनरचनेवर टीका, प्रवाशांत नाराजी

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

SCROLL FOR NEXT