Twinkle Khanna Sakal
मनोरंजन

Twinkle Khanna: आलिशान गाड्या सोडून ट्विंकलने केला रिक्षातून प्रवास; मुलगी निताराला पाहून चाहते खुश!

ट्विंकल खन्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्विंकल तिची छोटी राजकुमारी नितारासोबत ऑटो रिक्षामध्ये प्रवास करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड स्टार्स नेहमीच त्यांच्या आलिशान वाहनातून प्रवास करतात. पण असे अनेक कलाकार आहेत जे आपली महागडी वाहने सोडून मुंबईच्या रस्त्यावर ऑटोरिक्षाचा आनंद लुटताना दिसतात. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाही तिच्या मुलीसोबत ऑटो रिक्षामध्ये फिरताना दिसली आहे.

ट्विंकल खन्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्विंकल तिची छोटी राजकुमारी नितारासोबत ऑटो रिक्षामध्ये प्रवास करत आहे. तिच्या मुलीच्याही हातात काही शॉपिंग बॅग आहेत.

ट्विंकल खन्ना आणि तिची लाडकी मुलगी ऑटोरिक्षात बसताना पाहून पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. शेवटी, हा क्षण सर्वांसाठी खास होता, कारण बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमारची पत्नी आणि मुलगी त्यांच्या महागड्या आलिशान गाड्या सोडून सार्वजनिक वाहतुकीचा आनंद लुटताना याआधी क्वचितच पाहिलं असेल.

ऑटोमध्ये बसलेली ट्विंकल खन्ना रिक्षावाल्याला म्हणते - 'चलो भैय्या'. आई आणि मुलगी मग एकमेकांशी बोलतात आणि हसतात. दोघेही एकमेकांच्या कंपनीचा रिक्षात बसून आनंद लुटताना दिसत आहेत. ट्विंकल खन्नाच्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना ट्विंकलची ही स्टाइल आवडली आहे, तर काहीजण याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. काही लोक तिला ऑटोमध्ये पाहून मजाही घेत आहेत. अक्षय कुमारच्या पत्नीच्या या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे?

ट्विंकल खन्ना बद्दल बोलायचे तर तिने 2001 मध्ये अभिनय सोडला होता. यानंतर 2015 मध्ये तिने लेखनाच्या जगात प्रवेश केला आणि पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. अक्षयबद्दल बोलायचे तर तो नुकताच राम सेतू या चित्रपटात दिसला. अक्षय लवकरच सेल्फी या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT