Akshay Kumar, Twinkle Khanna 
मनोरंजन

अक्षय कुमारवर मदतीचा दिखाऊपणा करण्याचा आरोप; ट्विंकलचं सडेतोड उत्तर

निवृत्त IAS अधिकाऱ्याने केला अक्षयवर आरोप

स्वाती वेमूल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, बेड्स, औषधं उपलब्ध करून देऊन गरजूंची मदत केली. अशातच एका निवृत्त IAS अधिकाऱ्याने अभिनेता अक्षय कुमार Akshay Kumar आणि त्याती पत्नी ट्विंकल खन्नावर Twinkle Khanna पुरेशी मदत करत नसल्याचा आरोप केला. त्यांच्या या ट्विटवर ट्विंकल खन्नाने उत्तर दिलं आहे. (Twinkle Khanna reacts to allegations of Akshay Kumar not doing enough amid COVID 19 pandemic)

निवृत्त आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी ट्विट केलं, 'ट्विंकलजी, तुमचे पती हे देशातील सर्वांत श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत. इतरांकडून पैसे जमा करून मदत करण्याचं नाटक करण्यापेक्षा तुम्ही तुमचं हृदय थोडं मोठं करा. ही मदत मागण्याची नाही तर मदत करण्याची वेळ आहे.' यावर उत्तर देत ट्विंकल म्हणाली, 'आम्ही १०० कॉन्सन्ट्रेटर्स मदत म्हणून दिले आहेत आणि इतरही अनेक मार्गांनी आमचं मदतकार्य सुरू आहे. हे फक्त माझ्या किंवा तुमच्याविषयी नाही, तर सध्या सर्वांनी मिळून गरजूंची मदत करणं आवश्यक आहे. मिळून काम करण्याऐवजी एकमेकांवर टीका करण्यात वेळ घालवला जातोय, याचं दु:ख वाटतंय. सुरक्षित राहा.'

हेही वाचा : 'औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भररस्त्यात चोपलं पाहिजे'; रितेशचा संताप अनावर

गेल्या महिन्यात अक्षय आणि ट्विंकलने १०० ऑक्सिनजन कॉन्सन्ट्रेटर्सची मदत केली होती. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती. 'कुटुंबातील काही सदस्य आजारी आहेत, पण मी माझं काम थांबवू शकत नाही. मला शक्य होईल त्या प्रकारे मी गरजूंची मदत करेन', असंही ट्विंकलने म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : गुडलक कॅफे प्रकरणाची व्यवस्थापनाकडून दखल, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT