Twinkle Khanna has shared a video to show a glimpse of her morning routine.  Instagram
मनोरंजन

'सकाळी ५ वाजता माझ्यासोबत हे नेहमीच घडतं'; ट्विंकलची मॉर्निंग Good Or Bad?

अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केलेली ट्विंकल खन्ना आता लेखिका म्हणून नावारुपाला येतेय.

प्रणाली मोरे

ट्विंकल खन्नानं(Twinkle Khanna) सकाळी उठल्यावर एकंदरीत तिचं रुटीनं कसं असतं याची एक झलक चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे ट्विंकल खन्ना आता अभिनेत्री नाही तर लेखिका म्हणून जास्त ओळखली जातेय. हा नवीन प्रवास जेव्हापासनं सुरू झाला आहे तेव्हापासून तिचा दिवस सुरू होतो सकाळी ५ वाजता. पण एका Strange Reason मुळे तिची सकाळ सुरु होते असं ती का म्हणतेय बरं. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती आपली मुलगी निताराविषयी काही गोष्टी शेअर करताना दिसतेय. ट्वींकलनं तिच्या चाहत्यांनाही त्यांच्या सकाळच्या दिनक्रमाविषयी विचारणा केली आहे.(Twinkle Khanna shared a video on Instagram)

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय,''पक्षी एवढ्या सकाळी उठतात जेव्हा सूर्यही जांभळ्या देत अंथरुणात पहुडला असतो. पण मग ते इतक्या लवकर उठून काय करत असतील बरं? हे पहायच्या उत्सुकतेने मी उठते,हातात दोन कप चहाचे घेते अन् माझ्या लिखाणाच्या टेबलवर जाऊन बसते,समोर गार्डन व्ह्यूचा आनंद घेत. मला फक्त पहायचं असतं पक्ष्यांची एवढ्या सकाळची दिनचर्या काय असते म्हणून.सकाळाची सकारात्मक उर्जा घेतली की चांगल्या गोष्टी आपोआप घडतात''. आता आपल्यासंमोर ट्विंकलचं सकाळी ५ वाजता उठण्याचं कारण आलं असेलच.

ट्विंकलने शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात तिच्या आणि अक्षयच्या सी-व्ह्यू असलेल्या घराच्या गार्डन एरियापासून होते. सभोवतालच्या प्रसन्न निसर्गाला पाहून ती म्हणते,''सगळं कसं प्रसन्न दिसतंय. त्यानंतर तिनं तिच्या कामाचा टेबलही दाखवला आहे. जिथे लॅपटॉप आणि खूप सारे पेपर्स पडलेले आहेत. दोन कॉफीचे मग दिसत आहेत. ती म्हणते,ही अशी सगळी माझी लगबग सकाळी पाच पासून सुरू होते''. ट्विंकलच नाही तर अक्षय कुमारचा दिवसही अगदी सकाळी चार पासून सुरू होतो असं तो अनेकदा मुलाखतीत बोलला आहे. अक्षय सकाळी चार वाजता उठून सात च्या शिफ्टला म्हणे वेळेच्या आधीच हजर असतो. असं त्याच्या सहकलाकारांनीच अनेकदा सांगितलं आहे. त्यामुळे ट्वींकलच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी तिला लवकर उठवण्यासाठी अक्षयच कारणीभूत असेल असं मजेत म्हटलं आहे. तर कुणी म्हटलंय,'तुम्ही सीमेवरच्या सैनिकांसारखं दिवस-रात्र काम करता का दोघंही'.तर कुणी चाहत्यानं ट्विंकलनं मेकअप न करता व्हिडीओ पोस्ट केल्याबद्दल तिचं कौतूक केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT