Twinkle Khanna Will Honor By London University Esakal
मनोरंजन

Twinkle Khanna: वयाच्या पन्नाशीत अक्षयच्या पत्नीची यशस्वी भरारी! लंडन विद्यापीठाकडून होणार ट्विंकलचा गौरव

Vaishali Patil

 Twinkle Khanna Will Honor By London University: बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती आता जरी मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मिडियावर तिची चर्चा रंगतेच. कधी काळी मोठा पडदा गाजवणारी ट्विंकल ही आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

काही दिवसांपुर्वी ट्विंकलने ती मास्टर्स करायला लंडनला गेल्याचे एका पोस्टमधून चाहत्यांना सांगितले होते. आता नुकतच ट्विंकलने तिचा मित्र आणि चित्रपट निर्माता करण जोहरबद्दल असं काही वक्तव्य केलं की ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

ट्विंकलने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे ज्यात तिने लंडन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्याबद्दल आणि कवानाघ पुरस्कार प्राप्त केल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ट्विंकलने लिहिले की, “एक मोठा क्षण, आणि सुरुवातीला मला ते सर्वांना सांगायला थोडी लाज वाटत होती. पण हा क्षण दाखवतो की वय ही खरोखर फक्त एक संख्या आहे.

जी तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुमच्या मार्गात कधीच अडथळा आणत नाही. मला माझ्या फायनल प्रबंधासाठी पदवी मिळाली आहे. आता लंडन विद्यापीठाच्या गोल्डस्मिथ्सने पॅट कावनाघ पुरस्कारासाठी निवडले आहे.

यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की, कदाचित माझ्या जुन्या मित्राने 'स्टुडंट ऑफ द इयर'मध्ये चुकीच्या कलाकारांना कास्ट केले असावं.

या पोस्टमध्ये तिने एक पत्रही शेअर केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की तिचा पोर्टफोलिओ पॅट कवानाघ पुरस्कारासाठी निवडला गेला आहे, जो गोल्डस्मिथ्सच्या एमए इन क्रिएटिव्ह आणि लाइफ रायटिंग प्रोग्राममधील सर्वोत्कृष्ट कामासाठी दरवर्षी दिला जातो.

आता ट्विंकलची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अनेक कलाकारांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

तर ट्विंकल खन्नाचा पती अभिनेता अक्षय कुमारने देखील आपल्या पत्नीचे अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT