shah rukh khan, mannat, pathaan SAKAL
मनोरंजन

सिक्युरिटी गार्डचं दुर्लक्ष भोवलं.. Shah Rukh Khan च्या बंगल्यात दोन अज्ञात तरुणांची घुसखोरी, काय आहे प्रकरण?

मन्नत मध्ये दोन अज्ञात तरुणांची घूसखारी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय

Devendra Jadhav

Shah Rukh Khan News: शाहरुख खानचा बंगला मन्नत हा मुंबईतील एक पर्यटन स्थळ झालाय. मुंबईतील बांद्रा भागात असणारा मन्नत पाहण्यासाठी शाहरुखचे हजारो फॅन्स गर्दी करत असतात. मन्नत बंगल्याचं सर्वांच्या मनात एक वेगळंच आकर्षण आहे.

शाहरुख सुद्धा मन्नत बाहेरील गॅलरीत येऊन त्याच्या फॅन्सना अनेकदा भेटत असतो. पण याच मन्नत मध्ये दोन अज्ञात तरुणांची घूसखारी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. काय आहे प्रकरण? बघूया

(Two unknown youths break into Shah Rukh Khan's bungalow mannat)

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात दोन अज्ञात तरुणांनी जबरदस्तीने प्रवेश करून घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गुरुवारी रात्री बांद्रयातील मन्नत बंगल्यात सिक्युरिटी तोडून दोन तरुणांनी बंगल्यात प्रवेश केला.

सिक्युरिटी गार्डचं दुर्लक्ष या प्रकरणाला कारणीभूत ठरलं. या तरुणांनी बंगल्यात प्रवेश केला नाही तर थेट तिसऱ्या मजल्यावर जाऊन लपून बसले होते. शाहरुख खान घरी नसताना हा प्रकार घडला. या दोन तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, बाहेरील भिंत तोडून मन्नतच्या आवारात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले. पोलिस चौकशीदरम्यान, त्या पुरुषांनी दावा केला की ते गुजरातमधून आले होते आणि त्यांना शाहरुखला भेटायचे होते.

या दोघांनी बंगल्यात प्रवेश करून तिथे कचरा पसरवण्यास सुरुवात केली आणि तिसऱ्या मजल्यावर लपून बसले. मग पुढे सुरक्षा रक्षकांनी या दोघांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.

हा सर्व प्रकार जेव्हा घडला तेव्हा शाहरुख खान घरात उपस्थित नव्हता. तो जवान सिनेमाचं शूटिंग करण्यासाठी मुंबईबाहेर गेला होता. शाहरुख खान जेव्हा बंगल्यात परत आला तेव्हा हे प्रकरण मिटलं होतं.

शाहरुख सध्या विजय सेथुपती सोबत जवान सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुखच्या पठाणने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा गल्ला पार केलाय. जवान आणि डंकी हे शाहरुखचे आगामी सिनेमे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT