Raghav Juyal  
मनोरंजन

'अशा लोकांमध्ये योग्य संस्कारांची कमतरता'; राघवला केंद्रीय मंत्र्यांनी सुनावलं

'डान्स दिवाने' या शोमध्ये आसामच्या स्पर्धकाचा परिचय देताना 'चिनी' म्हणून केला उल्लेख

स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील 'डान्स दिवाने' Dance Deewane या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक राघव जुयाल Raghav Juyal सध्या वादात सापडला आहे. या शोच्या मंचावर राघवने आसामच्या स्पर्धकाचा परिचय करून देताना 'चिनी' असा उल्लेख केला. राघवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही ट्विट करत याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू Kiren Rijiju यांनी रिअॅलिटी शो आणि त्याचा सूत्रसंचालक राघवला सुनावलं. 'योग्य संस्कारांची कमतरता अशा लोकांमध्ये पहायला मिळते. अशा प्रकारची मानसिकता आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला नुकसान पोहोचवते', असं त्यांनी म्हटलंय.

नेमकं काय आहे प्रकरण?

'डान्स दिवाने' या रिअॅलिटी शोच्या मंचावर एका स्पर्धकाचा परिचय करताना राघव विचित्र भाषेत बोलतो. गुवाहाटीची स्पर्धक मंचावर तिचा डान्स सादर करण्यासाठी येणार होती. मात्र तिचा परिचय देताना राघवने 'मोमो', 'चाऊमीन', 'चायनीज' असा शब्दांचा वापर करत विचित्र भाषेत बडबडतो. यावेळी मंचावर प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा, तुषार कालिया, धर्मेश येलांडे आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित उपस्थित होते. राघवने दिलेल्या परिचयामुळे त्याच्यावर वर्णद्वेषाचा आरोप होत आहे.

किरेन रिजिजू यांचं ट्विट-

'योग्य संस्कारांची कमतरता अशा लोकांमध्ये पहायला मिळते. अशा प्रकारची मानसिकता आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला नुकसान पोहोचवते. मनोरंजन करताना अपमान आणि पूर्वग्रह या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आसाम आणि ईशान्येतील लोक हे प्रत्येक बाबतीत इतर भारतीयांप्रमाणेच भारतीय नागरिक आहेत,' अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं ट्विट-

'माझ्या लक्षात आलं आहे की एका लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाने गुवाहाटीमधल्या एका स्पर्धकाविरुद्ध वर्णद्वेषी भाषेचा वापर केला आहे. हे अत्यंत लज्जास्पद आणि अस्वीकार्य आहे. आपल्या देशात वंशवादाला स्थान नाही आणि आपण सर्वांनी त्याचा निःसंदिग्धपणे निषेध केला पाहिजे,' असं ट्विट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT