Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: करिनानं प्रशंसा केल्यानंतर उर्फी ढगात! रणबीरला म्हणाली,'गो टू हेल'

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद हे नाव सोशल मिडियावरील चर्चेतलं नावं आहे. उर्फी जावेद नेहमी तिच्या फॅशनने सर्वांना थक्क करते. विचित्र फॅशनचा नमुना सादर करण्याबरोबरच ती काही मुद्यावर तिचं मतही माडंत असते. त्याचबरोबर तिच्यावर टिका करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही ती देत असते.

अभिनेत्री करीना कपूर खान आणि रणबीर कपूर यांनी अलीकडेच उर्फी जावेदच्या फॅशन बद्दल त्याच व्यक्तीगत मत मांडल होतं. दोन्ही अभिनेत्यांनी दिलेल्या रिव्ह्यूमुळे उर्फी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली.

रणबीर कपूरने उर्फीच्या फॅशनचा फॅन नसल्याच म्हटलं तर करीनाने तिची खुप प्रशंसा केली.

उर्फी जावेदने आपल्या ताज्या मुलाखतीत पुन्हा एकदा करीना कपूरने केलेल्या स्तुतीबद्दल बोलली आहे. ती म्हणाला, 'मला यावर विश्वास बसत नव्हता, मला वाटलं की करीना कपूर जोक करत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर मला जाणवलं की मी आयुष्यात काहीतरी मिळवले आहे.

Urfi Javed

यासोबत उर्फीने सांगितले की, रणबीरच्या या कमेंटनंतर ती खूप नाराज झाली आहे. ती म्हणाली, 'रणबीर गो टू हेल, करिनाने माझे कौतुक केले आहे, आता रणबीरच्या मताची गरज नाही.'

त्याच झालं असं की करीना कपूरसोबतच्या संभाषणात रणबीरने खुलासा केला होता की तो उर्फीच्या फॅशनचा चाहता नाही आणि अभिनेत्रीच्या आवडीनिवडी खूपच खराब आहेत. हे त्याच व्यक्तीगत मत त्यांन सांगितले होते.

तर करिनानं उर्फीची प्रशंसा करत म्हटलं होतं की,''मी उर्फी एवढी साहसी मुळीच नाही. मला वाटतं की ती खूपच धाडसी आहे. ज्या आत्मविश्वासानं ती आपल्या ड्रेसला कॅरी करताना दिसते ते खूपच अद्भूत आहे. माणसाचा आत्मविश्वासच त्याला सुंदर बनवतो आणि उर्फीचा आत्मविश्वास मला खूप आवडतो''.

करीनाच्या या वक्तव्यानंतर उर्फीनं आपल्या ट्वीटर हॅंडलवर बेबोचे आभार मानले आहेत आणि लिहिलं आहे,''करीना खरंच असं म्हणाली आहे का की तिला मी आवडते. मला खरंच विश्वास नाही बसत की खरंच असं घडलं आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT