Uorfi Javed Esakal
मनोरंजन

Uorfi Javed: मेहनतीच्या जोरावर उर्फीनं 'त्याच्यासाठी' घेतली इतकी महाग कार! ऐकून नेटकरी शॉक...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस ओटीटी फेम आणि आपल्या फॅशन सेन्समुळं चर्चेत राहणारी उर्फी जावेद ही जवळपास सर्वांनाच माहित असेल. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. ज्यात ती तिच्या फॅशनचा अविष्कार दाखवत असते. ज्याचा तुम्ही आम्ही विचारही करु शकत नाही अशा वस्तूंचा वापर करुन ती कपडे तयार करते. ते कपडे परिधान करुन व्हिडिओही पोस्ट करते आणि थोड्याच वेळात ते व्हायरल होतात.

ती तिला या फॅशनमुळे अनेक वेळा ट्रोलही केलं जात मात्र त्याचा उर्फीवर काडीमात्र फरक पडत नाही. ती तिच्या फॅशनचा अविष्कार सुरुच ठेवते. नुकतच तिचं भयानक फोटोशुटही चांगलच व्हायरल झालं होतं.

तिच्या मेहनतीच्या जोरावर उर्फी आज मोठ्या स्थानावर आहे. आता उर्फी मोठ्या इव्हेंटमध्येही दिसत आहे. मोठमोठे डिझायनर त्याचे आउटफिट कॅरी करण्यासाठी उर्फीला बोलावतात. ती बॉलिवुडच्या पार्टीमध्येही दिसत आहे. फॅशन शोमध्येही ती रॅम्प वॉक करतांना दिसते. यावरुन उर्फीच्या वाढत्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येईल.

आता उर्फीच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा पाहुणा म्हणजे तिची नवीन चमकती कार आहे. खरं तरं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी एका नवीन कारसोबत दिसत असल्याचे दिसून येते.

हा व्हिडिओ थेट कारच्या शोरूम मधला आहे. जिथे उर्फी तिच्या नवीन कार सोबत दिसत आहे. तिनं ब्रँडची लाल रंगाची महिंद्रा जीप मेरिडियन खरेदी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

उर्फीची ही दुसरी कार आहे. या कारची किंमत 35 लाखांपर्यंत असल्याच सांगण्यात येत आहे. उर्फीच्या बहिणीने या कारसोबत उर्फीचा फोटो शेअर केला आहे. उर्फीचे चाहते नवीन कारसाठी तिचे अभिनंदन करत आहेत

मात्र, उर्फीने ही कार स्वत:साठी घेतली नसल्याचं तिनं सांगितलं आहे. तिने ही कार तिच्या टिम साठी घेतली आहे. जेणेकरून तिची टीम या कारमध्ये येऊन तिच्यासोबत सगळीकडे प्रवास करू शकेल.

उर्फी जावेदनेचा प्रवास आता यशाच्या दिशेने सुरु झाला आहे. तिने अबू जानी-संदीप खोसला ते गौरव गुप्ता आणि राहुल मिश्रा पर्यंतच्या ब्रँड्ससोबत काम केले आहे. टीव्ही सीरियल्समधून करिअरची सुरुवात करणाऱ्या उर्फीला 'बिग बॉस ओटीटी'मधून ओळख मिळाली. आता ती तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT