Uorfi Javed Name: Urfi Javed again changed her name Instagram
मनोरंजन

उर्फी जावेदनं बदललं नावं, नवीन स्पेलिंगमधील 'o' ची चर्चा, कारणही खास

सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच सगळ्यांना हैराण करून सोडणारी उर्फी जावेद लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात पटाईत आहे.

प्रणाली मोरे

सोशल मीडियावर(Social Media) आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच सगळ्यांना हैराण करून सोडणारी उर्फी जावेद(Uorfi Javed) लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात मागे हटत नाही. ती काही ना काही असे कारनामे करतेच की ज्यामुळे अगदी वाटत नसताना देखील लोकांचं लक्ष तिच्याकडे जातंच. ती असे अतंरगी ड्रेस घालते की ज्यामुळे नेहमीच तिच्यावर टिकेचा वर्षाव होतो. पण शांत बसेल ती उर्फी जावेद कुठली,ती ट्रोलर्सना बरोबर उलट उत्तर देऊन शांत करते. असो,पण आता ती आपल्या ड्रेस किंवा लूकमुळे चर्चेत आलेली नाही तर तिनं आपलं नाव बदललं आहे. आणि हे ती पहिल्यांदा करत नाही तर याआधी तिनं हे दोनवेळा केलेलं आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ग्लॅमर इंडस्ट्रीत नेहमीचं हे पाहिलं जातं की सेलिब्रिटी आपलं नाव बदलतात किंवा नावाचं स्पेलिंग बदलतात. आणि आपलं करिअर,भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सेलिब्रिटी हे सगळं करत असतात. पहिल्यांदा उर्फीनं Urfi असं नावाचं स्पेलिंग ठेवलं होतं. त्यानंतर तिनं Urrfi असं ते केलं. आणि आता तर तिच्या नावात 'o' चा काहीही संबंध नसताना तिनं Uorfi असं नावाचं स्पेलिंग बदलून घेतलं आहे. याविषयीची माहिती उर्फीनं आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

Uorfi Javed Post Image

उर्फीनं लिहिलं आहे,''मित्रांनो नमस्कार,मी माझं नाव आता अधिकृतरित्या बदलून UORFI असं ठेवलं आहे. त्याचा उच्चार उर्फी असाच असेल. फक्त स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. फक्त माझं इतकच म्हणणं आहे की लोकांनी आतापासून फक्त इतकंच ध्यानात ठेवायचं आणि हेच लिहायचं. आणि मी देखील ही गोष्ट आतापासून पुढे लक्षात ठेवीन''.

न्युमरोलॉजीनुसार, आपलं भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी आणि ते चमकवण्यासाठी,आपली अधिक प्रगती करण्यासाठी अनेक जण नावात बदल करत असतात. कारण जन्मतारीख बदलता येऊ शकत नाही म्हणून नावातच तो बदल करुन आपलं भलं होऊ शकतं असा समज आहे. उर्फीनं देखील याच कारणाने आपल्या नावात बदल केला आहे. सध्या उर्फीला मनासारखे प्रोजेक्ट मिळत नाही आहेत. आणि तिचं करिअर देखील जसं हवं तसं पुढे जात नाही जशी तिला अपेक्षा आहे. त्यामुळेच तिनं या भोळ्या समजुती पोटी तिसऱ्यांदा नावाचं स्पेलिंग बदलण्याचा कारनामा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT