Urfi Cannes 2023 : 
मनोरंजन

Urfi Cannes 2023 : 'हिला पाहून कान्समधील अभिनेत्रीही पळून जातील!' उर्फीचं नवं रुप

अतरंगी उर्फी जी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फीला कोणत्याही वस्तूच्या आधारे फॅशन करायला जमते.

सकाळ डिजिटल टीम

Uorfi Javed crossed all limits : आपण काहीही केलं की लगेच सोशल मीडियावर व्हायरल होतो. आपल्याला मोठी प्रसिद्धीही मिळते. असा एक दिवस जात नाही की ती सोशल मीडियावर तिचे फोटो आले नाहीत किंवा तिची एखादी बातमीही झाली नाही. राज्य महिला आयोगानं देखील तिला समज दिली पण शेवटी ती कुणाचचं ऐकेल असं वाटत नाही.

सध्या जगभरामध्ये कान्स चित्रपट महोत्सवाची मोठी चर्चा आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम चित्रपट या महोत्सवामध्ये येत असतात. त्याची चर्चा होते. वेगळे विषय समोर येतात. या महोत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महोत्सवातील रंगबाजी.... देश विदेशातील अनेक अभिनेत्री या महोत्सवामध्ये सहभागी होताना दिसतात. यापूर्वी भारतातून ऐश्वर्या रॉय, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, भुमी पेडणेकर सारख्या अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या.

सोशल मीडियावर मात्र आणखी एका सेलिब्रेटीच्या नावाची चर्चा होत आहे. ती दुसरी तिसरी कुणी नसून उर्फी जावेद आहे. अतरंगी उर्फी जी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फीला कोणत्याही वस्तूच्या आधारे फॅशन करायला जमते. तिचा फॅशन सेन्स कमालीचा जबरदस्त आहे. सहज म्हणून तिच्या इंस्टा अकाउंटवर नजर टाकल्यास उर्फी काय आहे कळायला वेळ लागणार नाही.

कान्समध्ये यंदा कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रींची वेगळी झलक पाहायला मिळणार अशी चर्चा सुरु असतानाच काही खोडसाळ नेटकऱ्यांनी उर्फीला देखील यामध्ये सहभागी करुन घ्यायला हवे. असे म्हटले आहे. काहींनी तर भारतातून एकच अभिनेत्री कान्समध्ये जाण्यास योग्य ती म्हणजे उर्फी. अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आताही उर्फीनं जी अतरंगी फॅशन केली आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

उर्फीचा तो ट्रान्सपरंट लूक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. एका इव्हेंटमध्ये गेली असताना उर्फीचे काही फोटो व्हायरल झाले आहे. त्यावरुन तिला ट्रोलही केले जात आहे. अशातच कान्स चित्रपट महोत्सव आणि उर्फीला तिथं मिळणारी प्रसिद्धी यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यापूर्वी देखील उर्फीनं अशा चित्रविचित्र पेहरावानं आपली चर्चा कशी होईल याची काळजी घेतल्याचे दिसून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT