uorfi javed Sakal
मनोरंजन

Uorfi Javed: कपडे खराब झाले म्हणून...; उर्फीचा नवा अवतार पाहालं तर बेशुद्ध व्हालं!

मॉडेल उर्फी जावेद कायम आपल्या विचित्र फॅशनमुळं चर्चेत असते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मॉडेल उर्फी जावेद कायम आपल्या विचित्र फॅशनमुळं चर्चेत असते. यामुळं ती मोठ्या प्रमाणावर टीकेची धनी देखील झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फीची तू तू मै मै बरीच गाजली. पण उर्फी ऐकेल ती कसली? ती आता पुन्हा एकदा आपल्या नव्या फॅशनमुळं नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. (Uorfi Javed new weired look with Jeans outfit)

उर्फी मुंबईच्या रस्त्यांवर जेव्हा कारमधून उतरली तेव्हा ती पापाराझींच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी तिला आपल्या अजब फॅशनबद्दल विचारलंच. पण जेव्हा उर्फी आपल्या कारमधून खाली उतरली तेव्हा सर्वजण आवाक् झाले. उर्फीनं चक्क जीन्स पॅन्ट अंगभर घातलेली दिसली. तिच्या या अजब फॅशनमुळं हसावं की रडावं असा प्रश्न रस्त्यावरील लोकांनाही पडला असेल.

उर्फीच्या या फॅशनवर नेटकऱ्यांनीही अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकानं म्हटलं की, आईस्क्रीम कोन पेक्षा हा ड्रेसतरी बरा आहे. एकानं तिला सल्ला दिला... वेडे, जिन्स वरती घालत नाहीत. एकानं म्हटलं की, कमीत कमी तिनं अंगतरी झाकून घेतलंय.

उर्फी जावेद अत्यंत तोकड्या कपड्यात मुंबईच्या रस्त्यांवर फिरत असल्याचा आरोप करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तिला निशाणा बनवलं होतं. जर उर्फीनं आपला हा प्रकार बंद केला नाही तर तिला थोबडवेल अशा शब्दांत वाघ यांनी तिला इशारा दिला होता. पण उर्फी चित्र

वाघ यांना चांगलीच पुरुन उरली, तिनं घाबरणं सोडाच उलट चित्र वाघ यांनाच आव्हान दिलं. दरम्यान, या प्रकरणात चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाला याची दखल न घेतल्याबद्दल निशाणा साधला होता त्यामुळं आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्र वाघ यांच्यामध्येही राजकीय आरोपप्रत्यारोप झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT