Urfi Javed on Tunisha Sharma
Urfi Javed on Tunisha Sharma Esakal
मनोरंजन

Urfi Javed: शीझानची काय चूक? उर्फीकडून समर्थन..

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं मालिकेच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 24 डिसेंबर,2022 ला घडली. 20 वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांना हादरा बसला. (Urfi Javed on Tunisha Sharma)

अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड आणि को-स्टार शीझान खानवर अनेक धक्कादायक आरोप आहेत. उर्फी जावेदने या संपूर्ण प्रकरणावर आपलं स्पष्ट मत मांडले आहे. शीजनला आरोपी बनवल्याच्या विरोधात ती उभी राहताना दिसत आहे.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका स्टोरीच्या माध्यमातून तुनिषा प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. शीजनने तुनिषाची फसवणूक केली हे मान्य केलं तरी तिच्या मृत्यूला जबाबदार ठरवणे हे चूकीचे असल्याचं तिचं मत आहे.

उर्फी म्हणते- 'तुनिषाच्या बाबतीत माझे स्पष्ट मत. होय, तो चुकीचा असू शकतो, त्याने तुनिषाशी फसवणूक केली असेल पण तिच्या मृत्यूसाठी तुम्ही त्याला जबाबदार धरू शकत नाही. ज्याला तुमच्यासोबत राहायचे नाही अशा व्यक्तीला तुम्ही जबरदस्तीने तुमच्या आयुष्यात ठेवू शकत नाही.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

उर्फीने पुढे लिहिले- 'मुलींनो, कोणीही इतकं मौल्यवान नाही की तुम्ही त्याच्यासाठी आयुष्य संपवा. कधीकधी असं वाटू शकते की सर्वकाही संपले आहे परंतु माझ्यावर विश्वास ठेवा असे नाही. जे तुमच्यावर प्रेम करतात किंवा त्यांचा विचार करा. स्वतःच्यासाठी हिरो व्हा आणि स्वतःला थोडा वेळ द्या. आत्महत्या करूनही समस्या संपत नाहीत. मागे राहिलेल्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.

उर्फीच्या या पोस्टवर सोशल मीडियावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक उर्फीच्या म्हणण्याशी सहमत आहेत, तर अनेकांनी तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी तुनिषाची आई वनिता शर्मा हिनेही आरोपी शीजान खानवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला आहे. त्याने सांगितले की, शीजान खान ड्रग्ज सेवन करायचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update: स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

SCROLL FOR NEXT