Urfi Javed Tweet esakal
मनोरंजन

Urfi Javed Tweet : 'चित्रू' म्हणत उर्फीनं पुन्हा काढली कळ! 'आपण आता...'

चित्रा वाघ यांचा उल्लेख तिनं चित्रु असा केला आहे, ते व्टिट आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Actress New tweet on BJP Chitra Wagh : मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अजब वेशभूषेनं नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीचा जलवा आता भलत्याच कारणामुळे समोर येतो आहे. त्याचे कारण ती बिनधास्तपणे भाजपच्या चित्रा वाघ यांना नडताना दिसत आहे. त्यांच्याशी तिनं घेतलेला पंगा हा सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या चित्रा वाघ या उर्फीवरुन खूपच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. राज्यात एवढे वेगवेगळे विषय असताना त्यांनी उर्फीच्या कपड्यांकडे का लक्ष वेधले आहे असा प्रश्न त्यांना नेटकऱ्यांनी विचारला आहे. यासगळ्यात चित्रा वाघ यांनी उर्फीला तर थेट थोबाड फोडेन असा दमच दिला होता त्याचे कारण म्हणजे उर्फीची फॅशन.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

उर्फीचा पेहराव हा तिच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरत असेल असं कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण काहीही झालं तरी उर्फी ही कुणाचं ऐकणारी नाही. चित्रा वाघ यांनी तर थेट तिला इशाराच दिला. महाराष्ट्रात राहायचं तर सभ्यता शिकावीच लागेल. असंही त्या म्हणाल्या होत्या. काल तर उर्फीच्या घराबाहेर भाजपच्या महिला संघटनेनं आंदोलनही केले होते.

उर्फीनं तर सातत्यानं सोशल मीडियावर वेगवेगळे टिव्ट करुन चाहत्यांचे आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. माझ्यावर टीका करताना तुम्ही विचार करायला हवा होता. असे उर्फीनं चित्रा वाघ यांना सुनावले आहे. आता तुम्हाला संजय राठोड आठवत नाही का, ते तुमचे मित्र झाले आहेत का, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर खूप टीकाही केली होती. अशा शब्दांत उर्फीनं चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता.

आता पुन्हा एकदा उर्फीचं एक नवं ट्विट व्हायरल झालं आहे. त्यामध्ये आपण लवकरच दोघी मैत्रीणी होऊ...असा उल्लेख करत चित्रा वाघ यांचा उल्लेख तिनं चित्रु असा केला आहे, ते व्टिट आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT