Urfi Javed Arrested Esakal
मनोरंजन

Urfi Javed Arrested: बोल्ड कपडे घालणं अखेर उर्फीच्या आलं अंगलट? पोलिसांनी घेतलं ताब्यात? व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Urfi Javed Arrested?: आपल्या हटके आणि भन्नाट ड्रेसिंग सेन्समुळे उर्फी जावेद ही नेहमी लाईमलाईटमध्ये असते. एकीकडे उर्फी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते तर दुसरी कडे तिच्या स्पष्टवक्ते शैलीमुळेही ती खूप चर्चेत असते. उर्फीच्या ड्रेसिंग सेन्स आणि फॅशनचे अनेक व्हिडिओ समोर येतात ज्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करतात.

तर अलीकडेच उर्फीला तिने केलेल्या लूकमुळे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तिच्या लुकमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तिला भर चौकात गोळी घालण्याची धमकी कुणीतरी उर्फीला दिली होती.

अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात उर्फीला मुंबई महिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता उर्फीला पोलिसांनी अटक केली आहे अशा चर्चा सोशल मिडियावर सुरु झाल्या आहे.

विरल भयानी ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उर्फी सकाळी कॉफी पीत असताना कथित पोलिस अधिकारी तिथे येतातआणि तिला ताब्यात घेतात. व्हिडिओमध्ये एका महिला पोलीस अधिकारी उर्फीला त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगते.

जेव्हा उर्फीने पोलिसांना तिला ताब्यात घेण्याचे कारण विचारले तेव्हा अधिकाऱ्याने विचारले, “इतके छोटे कपडे घालून कोण फिरतं?” त्यानंतर महिला पोलिस उर्फीला गाडीत बसवतात. यावेळी उर्फीने डेनिम पँटच्या जोडीसह बॅकलेस लाल टॉप घातला होता.

सध्या हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे एकीकडे नेटकरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांचे कौतुक करत आहे तर दुसरीकडे अनेकांनी याला प्रँक व्हिडिओ असल्याचे सांगितले आहे.

उर्फीला अटक का करण्यात आली याबाबत तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. तर काहींनी या व्हिडिओला प्रमोशनल व्हिडीओही म्हटले जात आहे.

मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सांगितले की ती गाडीही पोलिसांची नाही आणि त्या लोकांनी परिधान केलेला गणवेशही पोलिसांचा नाही त्यांमुळे हा व्हिडिओ खोटा असल्याचे बोलले जात आहे.

आता हा व्हिडिओ खरा आहे की उर्फीने स्वत: च तिच्यावर टिका करणाऱ्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ शूट केला आहे याबाबत तर उर्फीच सांगू शकेल. अद्याप या व्हिडिओची पुष्टी करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT