Urfi Javed childhood photo viral Instagram
मनोरंजन

Childrens Day 2022: उर्फीच्या बालपणीच्या फोटोचीही होऊ लागली चर्चा; लोक म्हणू लागलेयत...

उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलने आणि गेल्या काही दिवसांत तर तिच्या काही बोल्ड व्हिडीओमुळेही चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Childrens Day 2022: उर्फी जावेदचे आतापर्यंतचे अतरंगी बोल्ड लूक्स आपण पाहिले आहेत. यावेळी तिनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत असा फोटो पोस्ट केलाय जो पाहिल्यावर लोक गोंधळात पडले आहेत. या फोटोत उर्फीची आई आणि बहिण दिसत आहेत. अर्थात त्या फोटोत हे ओळखणं कठीण झालंय की या फोटोत नेमकी उर्फी कोण आहे. उर्फीनं याबाबतीत कोणताच खुलासा केलेला नाही. तिच्या बहिणीनं हे फोटो शेअर केलेयत. यामध्ये उर्फीच्या भावा-बहिणीचे लहानपणीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंना पाहून लोक मात्र हैराण झालेयत. (Urfi Javed childhood photo viral)

उर्फी जावेद आपल्या बोल्ड लूकमुळे आणि फोटोंमुळे नेहमी चर्चेत पहायला मिळते. आता तिनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असा फोटो पोस्ट केलाय की लोकांना ती ओळखू येईना. या फोटोत उर्फी आपल्या आई आणि बहिणीसोबत दिसतेय. या फोटोत नेमकी उर्फी कोण हे मात्र ओळखता येत नाही. तिची बहिण अस्फीने देखील हा फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबत आणखी फोटो देखील आहेत. उर्फीच्या बालपणीच्या फोटोवर लोकांनी भन्नाट कमेंट्स नोंदवल्या आहेत. एकानं तर चक्क सवाल केलाय, 'मोठी झाल्यावर अशी कशी झालीस?'

तुम्हालाही जर फोटोत नेमकी उर्फी कुठे आहे हे ओळखता येत नसेल तर आम्ही इथं थोडं उलगडून सांगतो. फोटोत डाव्या बाजूला ऑरेंज कलरचा टॉप घालून जी मुलगी दिसतेय ती उर्फी जावेद आहे. तिनं आपली बहिण उरुषासारखाच टॉप परिधान केला आहे. अस्फीनं जो दुसरा फोटो शेअर केला आहे त्यात त्यांचा भाऊ समीर आणि बहिण डॉली आहे. तिसऱ्या फोटोत डाव्या बाजूला अस्फी आणि उजवीकडे उर्फी आहे, यानंतरच्या फोटोत उर्फीनं ब्लॅक डंगरी घातली आहे. शेवटच्या फोटोत उर्फीची आई जकिया सुलतान देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT