Urfi Javed gave an epic reply to Farah Khan Ali.  Google
मनोरंजन

हृतिकच्या मेहुणीला उर्फीनं फटकारलं; म्हणाली,'असेल हिम्मत तर...'

हृतिकची पू्र्वाश्रमीची पत्नी सुझैन खानच्या बहिणीनं उर्फी जावेदसंदर्भात तिच्या ड्रेसवरुन खिल्ली उडवणारी पोस्ट केली होती.

प्रणाली मोरे

अतरंगी फॅशन करण्यामुळे अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. बरं ती नेहमीच आपले फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते अन् त्यावरनं अनेकदा ट्रोलही होताना दिसते. पण बिनधास्त उर्फी कधीच ट्रोलिंग मनावर घेताना दिसत नाही. उलट ट्रोल झाल्यानंतर तिचा पुढचा ड्रेस हा अधिक हटके असतो,अर्थात अतरंगी. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता,ज्यात ती मीडिया हाऊसच्या एका सुरक्षा रक्षकावर भलतीच चिडली होती. तिला त्या मीडिया हाऊसनं मुलाखतीसाठी निमंत्रण दिलं होतं पण तरिही त्या सुरक्षारक्षकानं तिला हटकलं. आता त्यावेळचे तिचे अतरंगी कपडे पाहून बहुधा तिच्याबद्दल तो साशंक झाला असेल अन् अनावधनानं अपमानास्पद बोलून गेला असेल. पण उर्फीचा पारा चांगलाच चढला होता.

उर्फीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला अन् नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पण यात आता ज्वेलरी डिझायनर फराह अली खानच्या कमेंटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिनं लिहिलंय,'' मला माफ करा माझं काही चुकत असेल तर पण या मुलीला अशी विचित्र फॅशन करण्यासाठी नक्कीच फटकारायला हवं. लोकं तिचा पेहराव पाहून तिची मजा उडवतायत आणि तिला वाटतंय लोकांना तिचा पेहराव आवडला म्हणून प्रशंसा करतायत. कोणीतरी तिला सांगा समजावून''. या फराहच्या कमेंटमुळे उर्फीचा पारा जास्तच चढला आहे.तिनं फराहला म्हटलंय,''फराह मॅम तुमच्यामते शिस्तीत चांगला पेहराव करणं म्हणजे नेमकं काय? कृपया मला समजावून सांगाल. मला माहिती आहे मी जसे ड्रेस घालते ते लोकांना आवडत नाही,मी कोणत्याही गैरसमजाची बळी नाही,हो पण मला लोकं काय म्हणतात याची फिकीरही नाही. त्यांच्या मतांचा मी विचार करीत नाही''.

Urfi Javed Instagram Post Image

''तुमचे नातेवाईक फिल्म निर्माते आहे,सिनेमाशी संबंधित आहेत,त्यांच्या सिनेमात आयटम नंबर करणाऱ्या महिला जे कपडे घालतात ते खूप चांगले शिस्तीतले असतात असं म्हणायचंय का तुम्हाला? आणि त्या आयटम नंबरमध्ये जे अंगप्रदर्शन केलं जातं ते चालतं का? तुमच्या घरात आधी डोकावून पहा. मग बाहेरच्यांना नावं ठेवा. तुमच्यासाठी हे कदाचित चालत असेल,स्टार किड्सनी कसेही कपडे घालणं,काहीही करणं. . तुम्ही म्हणालात,माझे ड्रेस लोकांना आवडत नाहीत,मी माझी फॅशन बदलावी. मग तुमच्या कुटुंबाविषयी देखील त्यांना खूप काही माहित आहे. तुम्ही ऐकून घ्याल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बदल कराल का स्वतःमध्ये? स्टार किड्स देखील त्यांच्या ड्रेसिंगमुळे ट्रोल होतात,त्यांना सांगाल का तुम्ही ड्रेसिंग सेन्स बदल म्हणून. ८० दशकातल्या लोकांना मी आवडणार नाही. उद्या लोकांनी उठून तुम्हाला सांगितलं तुमच्या मुलांचा चेहरा आवडत नाही,मग ते पण बदलाल का? यात काय लॉजिक आहे. तुम्ही तुमच्या मुलीशी हे बोलाल का? लोकांना नाही आवडलं,म्हणून स्वतःला बदला,हे तुमच्यासारख्या स्त्री कडून मला अपेक्षित नव्हतं. एक महिला असून दुसऱ्या महिलेला असं बोलून लाजवलंत तुम्ही. मी कधी तुम्हाला स्टार किड्सना असं फटकारताना पाहिलं नाही त्यांच्या चुकलेल्या ड्रेसिंग सेन्सवरुन?''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT