Urfi Javed Entertainment celebrity fashion esakal
मनोरंजन

Urfi Javed Fashion Video : शाळेचा ड्रेस घातला पण कसा? उर्फीची फॅशन विषय संपला!

मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच हटके गोष्टी करुन प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

युगंधर ताजणे

Urfi Javed Entertainment celebrity fashion : मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच हटके गोष्टी करुन प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र याला काही सेलिब्रेटी अपवाद आहेत. त्यात उर्फीची गोष्टच वेगळी आहे. तिनं काहीही केलं तरी ती चर्चेत येते. देशातील फॅशन क्षेत्रातील निराळी सेलिब्रेटी म्हणून तिनं तिची ओळख निर्माण केली आहे.

उर्फीला जी फॅशन योग्य वाटते ते ती बिनधास्तपणे करते. आणि आपण केलेली फॅशन नेटकऱ्यांनी पाहावी यासाठी ते व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्टही करते. आता कित्येकांनी तिच्यावर सडकून टीकाही केली आहे. तिला खूप काही सुनावलेही आहे. पण ऐकेल ती उर्फी कसली, आपल्याला जे वाटतं ते केल्याशिवाय शांत बसायचं नाही असा उर्फीचा स्वभाव आहे.

फॅशन विश्वात उर्फीचं नाव फारच वेगळ्या प्रकारे घेतले जाते. उर्फीनं तिच्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंची फॅशन करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर तिला आलेल्या कमेंटसही भन्नाट आहेत. कधी घरातील ग्लास, तर कधी चमचा तर कधी धागे दोरे यांच्या मदतीनं तिनं केलेला ड्रेस हा जोरदार चर्चेचा आणि कमेंटचा विषय ठरला आहे.

आता उर्फीचा एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तिनं शाळकरी मुलीचा ड्रेस परिधान केल्याचे दिसून आले आहे. मात्र तिनं तिच्या स्टाईलनं तो परिधान केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे तिची कानउघाडणी केली आहे. तिच्यावर टीकाही केली आहे. पण काहींनी मात्र तू देशातील एक क्रिएटिव्ह फॅशन सेन्स असलेली सेलिब्रेटी आहे असेही म्हटले आहे.

यापूर्वी वेगवेगळ्या फॅशन सेन्समुळे उर्फी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे तिला काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून देखील विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. पण त्या महिला नेत्यांना उर्फीनं तिच्या अंदाजात उत्तर देऊन गप्पगार केल्याचे दिसून आले होते. ते प्रकरण महिला आयोगापर्यत जाऊन पोहचले होते. त्यात कित्येक नेटकऱ्यांनी उर्फीला सपोर्ट केल्याचे दिसून आले होते.

उर्फीच्या नव्या व्हिडिओचं तिच्या चाहत्यांनी स्वागत केलं आहे. काहींनी तिला म्हटलं आहे की, तू नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे फॅशन करुन आम्हाला प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. तुझ्या फॅशन सेन्सचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT