Urfi Javed Fashion celebrity viral social media give  esakal
मनोरंजन

Urfi Javed : 'पैसे द्या, सेल्फी घ्या! उर्फीनं हाईट्च केली'...

उर्फी जिथे जाईल तिथे चर्चेत येते. तिच्यासोबत फोटो काढण्याची अनेकांना मोठी हौस असते.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Fashion celebrity viral social : उर्फीविषयी काय बोलावं आणि किती बोलावं हा एक मोठा प्रश्नच आहे. उर्फीचा एक दिवस असा जात नाही की त्यामुळे तिची चर्चा होत नाही. उर्फी आणि तिची वेशभूषा हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. भाजपच्या महिला संघटेननं देखील उर्फीच्या पेहरावावर आक्षेप घेतला होता. तिच्यावर सणसणीत टीकाही केली होती.

उर्फी जिथे जाईल तिथे चर्चेत येते. तिच्यासोबत फोटो काढण्याची अनेकांना मोठी हौस असते. उर्फी कोणत्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते आहे हे तिच्या चाहत्यांना कळण्याची खोटी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी होते. आताही एका कार्यक्रमामध्ये उर्फी आली असताना तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यातील बऱ्याचजणांना तिच्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. त्यावरुन उर्फीचा संताप झाल्याचे दिसून आले.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आपल्या तऱ्हेवाईक फॅशनसाठी उर्फी ही नेहमीच सोशल मीडियावर ओळखली जाते. बऱ्याच दिवसांपासून उर्फी ही सोशल मीडियावर नेटकऱ्यांची नाराजी ओढावून घेताना दिसते आहे. आपण काहीही झालं आणि कुणीही सांगितलं म्हणून कपड्यांची फॅशन बदलणार नाही. माझी फॅशनही माझ्यासारखीच हट्टी आहे. हे माझ्यावर टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. असे मत उर्फीनं व्यक्त केले आहे.

उर्फीसोबत ज्यांनी सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर उर्फीनं आता लोकांकडे वेगळीच मागणी केली आहे. त्यामुळे उर्फी ही ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. ज्यांना कुणाला माझ्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे त्यांनी पैसे द्यावे. पैसे द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या. असे उर्फीनं म्हटले आहे. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटस व्हायरल झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT