Urfi Javed latest video she wear metal wire bra dress
Urfi Javed latest video she wear metal wire bra dress sakal
मनोरंजन

Urfi Javed video: भांडी घासायचा काथ्या लावून आली उर्फी; नेटकरी म्हणाले, हिच्यावर..

नीलेश अडसूळ

urfi javed latest video: फॅशन जगतात रोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. ती तिच्या लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण करते. प्रत्येक वेळी तिची नवीन स्टाईल लोकाना वेड लावते. काही दिवसांपूर्वीच उर्फीने बॅकलेस शर्ट घालत नेटकऱ्यांचा पारा चढवला होता. त्याला दोन दिवस झाले नाही तोवरच उर्फीने आणखी एक चित्र विचित्र लुक केला आहे. तिचा हा लुक पाहून तुमचेही डोळे फिरतील..

(Urfi Javed latest video she wear metal wire bra dress)

उर्फीचा एक व्हिडिओ नुकताच इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिचा यापूर्वी कधीही न पाहिलेला लूक समोर आला आहे. उर्फीचा हा लुक नेहमीप्रमाणेच बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. उर्फीने शेअर केलेल्या या नवीन व्हिडिओमध्ये ती कोणताही टॉप घालण्या ऐवजी चक्क तार काथ्या गुंडाळून आली आहे. आपल्या घरात भांडी घासायला वापरला जाणारा काथ्या घेऊन त्यापासून तिने कपडे बनवले आहेत. कपडे म्हणजे जवळजवळ पूर्ण अंग उघडंच आहे. या काथ्याच्या कपड्यांना तारेने गुंडाळून स्वतःच्या अंगावर घट्ट बसवले आहे. अशी विचित्र फॅशन करून तिने पुन्हा एकदा अत्यंत बोल्ड लुक दिला आहे.

उर्फीच्या या व्हिडीओला काही चाहत्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलेच सुनावले आहे. असले विचित्र प्रकार कुठून सुचतात, हिच्यावर कोणी गुन्हा दाखल का करत नाही, ही वेडी झाली आहे का अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत. उर्फी कधी अशी काही फॅशन करेल याचा कुणी विचारहि केला नव्हता. पण तिने हा भलताच प्रयोग केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT