Urfi Javed, Urfi Javed news, Urfi Javed new fashion  SAKAL
मनोरंजन

Urfi Javed: कोणाचं टक्कल केलंस गं..! उर्फीने केसांपासून बनवलेल्या ड्रेसची भलतीच चर्चा, व्हिडिओ व्हायरल

आता उर्फीचा नवीन ड्रेस समोर आलाय, यात चक्क तिने केस वापरले आहेत

Devendra Jadhav

Urfi Javed New Dress News: अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद हिची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. उर्फीची फॅशन हि नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय. उर्फी जावेद नेहमीच तिच्या फॅशनसोबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसते.

कधी ती सायकलच्या चैननं ड्रेस बनवते तर कधी मोबाईल फोनच्या सिम कार्डनं तर कधी आपल्या टॉपच्या जागी लहान मुलांच्या खेळणीने. आता उर्फीचा नवीन ड्रेस समोर आलाय, यात चक्क तिने केस वापरले आहेत. या ड्रेसची सध्या भलतीच चर्चा रंगलीय.

उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उर्फीचा ड्रेस एकदम अनोखा दिसतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून उर्फीचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

या व्हिडिओमध्ये उर्फीने क्रॉप-टॉप आणि जीन्स घातली आहे आणि तिने पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. उर्फी जावेदचे क्रॉप-टॉपच्या पुढच्या भागावर खोटे केस लावले आहेत जे तिच्या गुडघ्यापर्यंत लटकले आहेत.

केसांपासून उर्फीने जो ड्रेस घातलाय ज्यामुळे उर्फी ट्रोल झाली नाही तरच नवल. एका यूजरने लिहिले आहे, 'याचा अर्थ ती कुठेही काहीही ठेवते.'

एका यूजरने लिहिले आहे की, 'फॅशनच्या नावावर काहीही.' तिसऱ्या यूजरने लिहिले, 'उर्फी जावेद वेडी झाला आहे.'

चौथ्याने लिहिले, 'अरे देवा पक्की हडळ दिसतेय. फक्त पाय उलटे पाहिजे होते.' अशा भन्नाट कमेंट करून उर्फीला लोकांनी ट्रोल केलंय.

काहीच दिवसांपुर्वी उर्फी जावेद आपल्या नव्या आऊटफिटमध्ये समोर आली होती. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे,ज्यामध्ये तिचा एक नवा आऊटफिट नजरेस पडलेला. व्हिडीओमध्ये अभिनेत्री शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे आणि त्या ड्रेसवर तिनं एक फर्रचं जॅकेट घातलं आहे ज्यामुळे तिचा आऊटफिट चर्चेत आहे.


उर्फी जावेदचा नवीन ड्रेस यामुळे चर्चेत आहे कारण वेगळं होतं. तिने जे फर्रचं जॅकेट कॅरी केलं आहे ते मुलांच्या खेळण्यांमधील छोट्या बाहुल्यांनी बनवलं आहे. उर्फी जावेद,जी एकदम विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते, तिचा हा नवा प्रयोगशील लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे. आता उर्फीच्या केसांपासुन बनवलेल्या या नवीन ड्रेसची चर्चा झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT