Urfi Javed New Video Esakal
मनोरंजन

Urfi Javed New Video: 'गजरा मोहब्बत वाला'... उर्फी आली अन् फॅशनचा रेकॉर्डचं तोडून गेली

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed New Video: उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी तसेच तिच्या वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. उर्फी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत असते ज्यात ती तिची फॅशन दाखवत असते. गेल्या काही दिवसांपुर्वी उर्फीनं ट्विट करत लिहिल होत की ती आता या पुढे असे कपडे घालणार नाही ज्याने लोकांच्या भावना दुखावल्या जातात.

त्याचबरोबर तिने सर्वांची माफी देखील मागितली होती. तिचं हे ट्विट काही तासातच व्हायरल झालं. अनेकांनी उर्फी सुधरली असल्याची प्रतिक्रियाही दिली होती. मात्र दुसऱ्याचं दिवशी तिनं दुसरं ट्विट शेअर करत पुन्हा सर्वांना आश्चर्य चकित केलं. तिनं सर्वांना एप्रिल फुल बनवलं असल्याच तिनं म्हटलं आणि यापुढेही ती अशीच फॅशन सुरु ठेवणार असल्याचं सांगितलं.

उर्फी ही तिच्या चित्र विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते आणि ती तिची ओळख कायम ठेवणार असल्याचं तिनं सांगितलं.

आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे.

इतकच नाही तर आपल्या कल्पना शक्तीच्या पलिकडे तिची फॅशन असते. आता नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. जो काही क्षणातच व्हायरल झाला आहे.

यावेळी तिने अंगावर कपडे नाही तर गजरे लावले आहे. होय तिने तिच्या शरीराचा काही भाग हा गजऱ्याने लपवला आहे. तिच्या हातला आलता लावला आहे. तिच्या या व्हिडिओच्या मागे जुनं गाण लावलं आहे. तिचा हा लुक नेटकऱ्यांना मुलीच आवडलेला नाही.

उर्फी जावेदने रविवारी आपला बोल्ड व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्फी जावेदने गजरा फ्लॉवर स्कर्ट बनवला आहे. त्याचबरोबर टॉपलेस होऊन तिने गजराच्या फुलांनी हात आणि अंग झाकले आहे. उर्फी जावेदने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये एक फूल पोस्ट केले आहे.

त्यांनी पुन्हा तिला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहिलय की सुरवातीला गजरा पाहून वाटलं की उर्फी ही पांरपारिक ड्रेसमध्ये दिसेल मात्र नंतर भ्रमनिरास झाला. तर दुसऱ्याने लिहिलयं की, 'रमजान सुरु आहे त्याचा तरी विचार करं'. एका यूजरने लिहिले आहे की, 'ती वेडी झाली आहे, लाज नाही वाटत.' एका यूजरने लिहिले आहे की, 'या सगळ्यातून काय हवंय? अशा अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी तिच्यावर टिका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

SCROLL FOR NEXT