Urfi Javed recently made her outfit with toilet paper trolled viral video  Esakal
मनोरंजन

ए बाई तो टॉयलेट पेपर तरी सोड! उर्फीची फॅशन पाहून नेटकरी म्हणाले, 'रमजान आहे जरातरी..'

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवुडमध्ये अनेक फॅशन आयकॉन आहेत. ज्याच्या स्टाईल आणि फॅशनची चाहत्यांना भुरळ पडते. त्यात शिल्पा शेट्टी असो किंवा सोनम कपुर. यांची स्टाईल अनेक कलाकार फॉलो करतात. मात्र या फॅशन जगतात उर्फी जावेद हे नावंही सामिल आहे.

ते म्हणतात ना 'नाम ही काफी है' तसं काहीसं उर्फी जावेदबाबत बोललं तर वावगं ठरणार नाही. तुम्हा कल्पनाही करु शकत नाही अशी फॅशन उर्फी घेवुन येते. असे बरेच उदाहरण आहेत. तिची फॅशन पाहिल्यानंतर नेटकरी थेट डोक्याला हात लावतात.

आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे आणि नवीन फॅशनचा नमुना सादर केला आहे. यात आता तिची बहिणही सहभागी झाली आहे.

उर्फी जावेदने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची बहीण आस्फी जावेद दिसत आहे. ती तिच्या आईला टिश्यू पेपरबद्दल विचारते. ती म्हणते- मम्मी सगळे टिश्यू पेपर कुठे गेले? कालच आणले. यानंतर, अचानक तिच्या डोक्यात येत की, उर्फी आली का? यानंतर उर्फी तिच्या नव्या अवतारात दिसत आहे. तिने त्याच कागदांपासून बनवलेला टू-पीस ड्रेस घातला आहे.

मात्र,तिचा हा ड्रेस इतर ड्रेसपेक्षा बराच आहे. पण तरीही लोकांना ते आवडले नाही. त्यांनी तिला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी तिला पवित्र रमजान महिन्याची आठवण करून दिली. कोणीही कितीही बोलल किंवा टिका केली तरी उर्फी काही कुणाच ऐकणार नसल्याचं दिसतयं. असंही ते म्हणताय.

तिच्या व्हिडिओलाही अनेक कमेंट आल्या आहेत. एकानं लिहिलयं की, किमान रमजानमध्ये तरी असे फालतू काम सोडं तर दुसऱ्याने लिहिले की, आता टॉयलेट पेपरही तर एकाने विचारले, उर्फी जी घालायला अजून काही उरले आहे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT