(Uorfi Javed and Chitra Wagh Controversy 
मनोरंजन

Uorfi Javed : हिंदू राष्ट्र, तालिबान, महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ; उर्फीचे खळबळजनक ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

Uorfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद आणखी वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी तक्रार देखील घेतली होती. (Uorfi Javed and Chitra Wagh Controversy)

उर्फी जावेदची आज अंबोली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. यावेळी उर्फीने तिला संविधावने कपडे परिधान करण्याचे स्वतंत्र्य दिले असल्याचे सांगितले. दरम्यान उर्फी जावेदने ट्वीटरवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

"एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय?", असा सवाल उर्फी जावेदने उपस्थित केला आहे. 

उर्फी जावेदने नाव न घेता थेट चित्रा वाघ यांच्यावर आक्रमक हल्ला केला आहे. "बलात्कार, डान्सबार आणि राजकारणी नेते महिलांना तिच्या कपड्यांमुळे मारण्याची उघडपणे धमकी देतात, हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही," असे उर्फीने म्हटले आहे. 

उर्फीने काही लेण्यांचे फोटो देखील ट्वीट केले आहेत. "प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असत. हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, खेळ, राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते लैंगिक आणि स्त्री शरीराबाबत सकारात्मक लोक होते. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या," असा सल्ला उर्फीने नाव न घेता चित्रा वाघ यांना दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT